बॉलिवूडची एकमेव फीमेल सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांची आज जयंती. त्यांच्या 60व्या जयंतीनिमित्त गुगलने आपल्या खास अंदाजात त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलने श्रीदेवींसाठी आज एक डूडल समर्पित केलं आहे.
तुम्ही जर आज गुगलचं मुख्य पान उघडलं, तर त्यावर गुगलच्या लोगोऐवजी एक खास डूडल आर्ट तुम्हाला दिसेल. एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या श्रीदेवी यांचं डान्सिंग पोझमधील सुंदर असं पेंटिंग यात आहे. त्यांच्या हातामधील बांगड्यांमध्ये Google शब्दातील oo ही अक्षरे जोडण्यात आली आहेत. एखाद्या जुन्या चित्रपटाचं पोस्टर वाटावं असं हे डूडल आहे.
श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 साली तेव्हाच्या मद्रासमध्ये झाला होता. श्री अम्मा यांगर अय्यपन हे त्यांचं खरं नाव होतं. सिनेसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी श्रीदेवी या नावाने अभिनय सुरू केला. बॉलिवूडसोबतच त्यांनी तेलुगू, मल्याळम आणि तामिळ या भाषांतील चित्रपटांमध्येही काम केलं. त्या एक उत्तम अभिनेत्री होत्याच, मात्र सोबतच एक उत्कृष्ट डान्सरही होत्या. (Entertainment News)
24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये श्रीदेवींचं अचानक निधन झालं. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्या दुबईला गेल्या होत्या. यावेळी हार्ट अटॅकमुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.