Google AI Photo Editor Tools : गुगलने आपल्या सर्व यूजर्सना एक मोठं गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. फोटो एडिटिंग करण्यासाठीचे कित्येक एआय फीचर्स आता गुगल आपल्या सर्व यूजर्सना मोफत देणार आहे. यापूर्वी हे फीचर्स केवळ गुगल वनच्या सबस्क्रिप्शनवर उपलब्ध होते. यामध्ये मॅजिक एडिटर आणि मॅजिक इरेजर या टूल्सचाही समावेश आहे.
आजकाल सर्वच कंपन्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर भर देत आहेत. यामुळेच गुगलने हा निर्णय घेतला आहे. 15 मे पासून हे फीचर्स सर्व Google Photos यूजर्सना मोफत मिळतील असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
गुगलचं Magic Editor हे फीचर गेल्या वर्षी लाँच करण्यात आलं होतं. हे एआय फोटो एडिटिंग फीचर सुरुवातीला केवळ Pixel 8 सीरीजमध्ये उपलब्ध होतं. मात्र, हे फीचर आता सर्व पिक्सेल स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे. या फीचरमुळे फोटोमधील एखादी गोष्ट बदलणे, दुसरीकडे शिफ्ट करणे, बॅकग्राउंड बदलणे, फोटोमधील गॅप्स भरुन काढणे अशा गोष्टी एडिट करता येतात.
पिक्सेल व्यतिरिक्त इतर फोन वापरणाऱ्या गुगल फोटोज यूजर्सना देखील मॅजिक एडिटरचे फीचर्स मिळणार आहेत. मात्र, त्यांना महिन्याला केवळ 10 फोटो एडिट करता येतील. यापेक्षा जास्त फोटोंसाठी हे फीचर वापरायचे असतील, तर गुगल वनचं प्रीमियम सबस्क्रिप्शन्स घ्यावं लागेल. हे फीचर्स वापरण्यासाठी तुमच्याकडे Android 8.0 किंवा iOS 15 पेक्षा पुढचे सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. तसंच फोनमध्ये कमीत कमी 3GB रॅम असणं आवश्यक आहे.
Magic Eraser फीचरमुळे यूजर्सना आपल्या फोटोमधील नकोशा गोष्टी काढून टाकता येतील. हे फीचर गुगलने 2021 साली लाँच केलं होतं. यासोबतच फोटो अनब्लर, पोट्रेट लाईट, एचडीआर इफेक्ट, कलर पॉप, कोलाज स्टाईल्स, सिनेमॅटिक फोटोज, पोट्रेट ब्लर, स्काय सजेशन्स, व्हिडिओ इफेक्ट्स असे कित्येक फीचर्स गुगल यूजर्सना आता मोफत मिळणार आहेत. टप्प्या-टप्प्याने हे फीचर्स रोलआऊट करण्यात येतील असं गुगलने स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.