नागपूर : एक नाही दोन नाही तर अनेक वर्षांपासून आपल्या विशेष आठवणी जपण्याचं काम कुठल्या अप्लिकेशननं केलं असेल तर ती अप्लिकेशन म्हणजे Google Photos. यात आपण काढलेले फोटो किंवा आपल्या मोबाईलमध्ये असलेले फोटो अगदी सुरक्षितपणे कित्येक वर्ष राहतात. आपल्या ई-मेल आयडीच्या (Gmail login) माध्यमातून हे फोटो सुरक्षित असतात. एखादा फोटो तुमच्या मोबाईलमधून डिलीट (Backup My Data) झाला तरी google photos मध्ये तो फोटो मिळतोच. आतापर्यंत हे फिचर यूजर्सना फ्री होतं. मात्र आता Google Photos मध्ये बदल होणार आहे. हा बदल नक्की कोणता असणार आणि काय असणार नवीन पॉलिसी हेच आपण आज जाणून घेणार आहोत. (Google Photos will not be free for users after 1st June 2021)
काय आहे नवीन पॉलिसी?
येत्या १ जूनपासून Google Photos वर तुम्ही अपलोड केलेले कोणते ही फोटो किंवा व्हिडीओ हे तुम्हाला देण्यात येणाऱ्या १५ GB स्टोरेजमध्ये स्टोर करून ठेवण्यात येतील. यात तुमचे सर्व फोटो आणि व्हिडीओ हाय रिझॉल्युशनमध्ये स्टोर करण्यात येतील. मात्र जर तुमचं फ्री स्टोरेज म्हणजेच १५ GB संपलं तर उर्वरित सर्व फोटो आणि व्हिडीओसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. Google Photos नं त्यांची अनलिमिटेड फ्री सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत स्टोर असलेल्या डेटाचं काय?
१ जूनच्या आधी तुम्ही स्टोर केलेले सर्व फोटो आणि व्हिडीओ हे १५ GB फ्री स्टोरेजमध्ये मोजले जाणार नाहीत. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ फ्री स्टोरेजमध्येच असतील. मात्र १ जूननंतर अपलोड करण्यात आलेल्या फोटो आणि व्हिडीओसाठी ही पॉलिसी लागू असणार आहे. तुम्ही तुमचं आताच स्टोरेज Backup and Synchronize सेक्शनमध्ये जाऊन चेक करू शकता.
काय आहे Additional Storage पॉलिसी?
Backup दरम्यान तुमचा १५ GB स्टोरेज संपला तर अजिबात टेन्शन घेऊ नका. महिन्याला काही पैसे भरून तुम्ही Additional Storage मिळवू शकता. यासाठी Google कडून काही प्लॅन्स ऑफर करण्यात आले आहेत.
१०० GB स्टोरेज -- १३० रुपये प्रति महिना
१ TB स्टोरेज -- ६५० रुपये प्रति महिना
इतकंच नाही तर Google कडून युजर्ससाठी वर्षभराचे प्लॅन्सही ऑफर करण्यात आले आहेत.
१०० GB प्रति महिना -- १ वर्षासाठी -- १३०० रुपये
१ TB प्रति महिना -- १ वर्षासाठी -- ६५०० रुपये
Google कडून देण्यात आलेलं १५ GB स्टोरेज पूर्ण होत आलं की नोटिफिकेशनद्वारे याची आठवण करून दिली जाणार आहे. ज्यामुळे यूजर्सना additional storage घेण्यासाठी सोपं होणार आहे.
Google Pixel युजर्सना सूट
Google photos ची नवीन पॉलिसी Google Pixel स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी नसणार आहे. Google Pixel धारकांना पूर्वीप्रमाणेच Google photos फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे.
(Google Photos will not be free for users after 1st June 2021)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.