Pixel 7 Series: गुगलचा फ्लॅगशिप फोन भारतात लॉन्च, किंमत-फीचर्ससह जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

google pixel 7 series launched in india pixel 7 pixel 7 pro check price features here
google pixel 7 series launched in india pixel 7 pixel 7 pro check price features here
Updated on

Google ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 7 सीरीज 6 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज या वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये लॉन्च केला आहे. या सीरीजअंतर्गत Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. Google ने Pixel 7 सीरीजसोबत Pixel Watch आणि Pixel Tablet देखील लॉन्च केले आहे. कंपनीने हे प्रॉडक्ट्स न्यूयॉर्कमधून मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये लॉन्च केली आहेत. दोन्ही स्मार्टफोन टेन्सर टी2 प्रोसेसरने सुसज्ज आहेत. Pixel 7 मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले आहे आणि Pixel 7 Pro 6.7-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Pixel 7 सीरीजची किंमत किती?

Google Pixel 7 ची किंमत 59,999 रुपयांपासून सुरू होते आणि Pixel 7 Pro ची सुरुवातीची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Google Pixel 7 स्नो, ऑब्सिडियन आणि लेमोन्ग्रास रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे, तर Pixel 7 Pro हेझेल, ऑब्सिडियन आणि स्नो कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन 13 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. कंपनी विशेष ऑफर म्हणून Pixel 7 वर 6,000 रुपये आणि Pixel 7 Pro वर 8,500 रुपयांचा कॅशबॅक ऑफर करणार आहे.

google pixel 7 series launched in india pixel 7 pixel 7 pro check price features here
Airtel 5G Plus: आठ शहरांमध्ये लाँच झाली सेवा, येथे जाणून घ्या सर्वकाही

Pixel 7 Pro चे स्पेसिफीकेशन्स आणि फीचर्स

Google Pixel 7 Pro ला Zirconica-blasted aluminium body design मध्ये सादर करण्यात आले आहे. फोनमध्ये 6.7-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले आहे, जो (3,120 x 1,440 pixels) रिझोल्यूशन आणि 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्मार्टफोनमधील Tensor T2 प्रोसेसरसह सेक्युरिटीसाठी टायटन M2 प्रोसेसर सपोर्ट मिळतो. Pixel 7 Pro ला 12 GB RAM सह 256 GB स्टोरेज मिळते.

google pixel 7 series launched in india pixel 7 pixel 7 pro check price features here
Affordable 5g Phone: 5G स्मार्टफोन घेताय? स्वदेशी कंपनीचा 'हा' सर्वात स्वस्त फोन आहे बेस्ट ऑप्शन

Google Pixel 7 Pro सह VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) सपोर्ट देण्यात आला आहे. मात्र, हे फिचर भारतीय युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. Google Pixel 7 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. प्रायमरी कॅमेरामध्ये 2X झूम उपलब्ध आहे. दुसरी लेन्स 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आणि तिसरी 48 मेगापिक्सल्सची टेलीफोटो लेन्स आहे. 30x सुपर रिझोल्यूशन झूम आणि 5x ऑप्टिकल झूम टेलीफोटो कॅमेरा सपोर्ट दिला आहे. यासोबतच फोनमध्ये 10.8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. गुगल पिक्सेल 7 प्रो सह सिनेमॅटिक व्हिडिओ देखील शूट केला जाऊ शकतो.

कनेक्टिव्हिटीसाठी, फोन 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्टला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरही उपलब्ध आहे. फोनच्या बॅटरीबद्दल, कंपनीचा दावा आहे की फोनमध्ये फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे आणि बॅटरी सेव्हर मोडसह 72 तासांचा बॅकअप देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.