Google Pixel 7 Discount : गुगलच्या Pixel 7 मोबाईलवर चक्क 27,000 हजारांची सूट; फ्लिपकार्टवर सुरू झालाय लूट सेल,आणखी काय स्पेशल?

Flipkart Flagship Sale 2024 : गुगल 13 ऑगस्ट रोजी आपली नवीन Pixel 9 सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. या मोबाईल लाँचच्या आधीच जुन्या Pixel सीरीजवर फ्लिपकार्टवर तुम्हाला जबरदस्त सूट मिळणार आहे.
Google Pixel 7 Available at Rs 30,999 on Flipkart
Google Pixel 7 Available at Rs 30,999 on Flipkartesakal
Updated on

Flipkart Sale Discounts : फ्लिपकार्ट ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर 6 ऑगस्टपासून फ्लॅगशिप सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर आणि गॅजेट्सवर बंपर डिस्काउंट ऑफर्स मिळत आहेत. गुगल 13 ऑगस्ट रोजी आपली नवीन Pixel 9 सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. या मोबाईल लाँचच्या आधीच जुन्या Pixel सीरीजवर फ्लिपकार्टवर तुम्हाला जबरदस्त सूट मिळत आहे. Pixel 8 Pro, Pixel 8, Pixel 7a आणि Pixel 7 या सर्व स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स आहेत. पण सर्वात मोठी आनंदाची बाब म्हणजे Pixel 7 आता Pixel 7a पेक्षाही स्वस्त मिळतोय.

फ्लिपकार्टवर Pixel 7 ची किंमत किती?

2023 मध्ये भारतात लाँच झालेल्या Google Pixel 7 ची किंमत त्यावेळी 59,999 रुपये होती. पण आता फ्लिपकार्टवर हेच फोन तुम्हाला 32,999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच तब्बल 27,000 रुपयांची बचत होणार आहे.

Google Pixel 7 Available at Rs 30,999 on Flipkart
BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटात मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

इतकेच नाही तर ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास आणखी 2,000 रुपये सूट मिळणार. म्हणजे Pixel 7 ची अंतिम किंमत 30,999 रुपये इतकी होईल. हे तर Pixel 7a पेक्षाही 5,000 रुपये स्वस्त आहे. (Pixel 7a ची फ्लिपकार्टवर किंमत 35,999 रुपये आहे.)

Google Pixel 7 Available at Rs 30,999 on Flipkart
Nothing Smartphone Launch : सेल्फी लवर्ससाठी आनंदाची बातमी! स्मार्टफोनच्या दुनियेत धमाका करणाऱ्या फोनची होणार दमदार एंट्री

Google Pixel 7 च्या स्पेसिफिकेशन्स

  • 6.3 इंचाचा FHD+ डिस्प्ले (90Hz रिफ्रेश रेट)

  • Googleचा नवीन Tensor G2 प्रोसेसर

  • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज

  • 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स

  • 50MP मुख्य कॅमेरा (मागील बाजू) आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा

  • 10.8MP फ्रंट कॅमेरा

  • एका चार्जवर 72 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ (एक्सट्रीम बॅटरी सेवर मोड वापरल्यास)

हे काय सांगायचं तर, Pixel 9 येण्याआधीच Google Pixel 7 घेण्याची ही सुवर्ण संधी आहे. फक्त फ्लिपकार्टवर ही ऑफर उपलब्ध आहे. मग वाट कशाची पाहताय? आजच फ्लिपकार्टवर जाऊन नवनवीन ऑफर्सचा लाभ घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.