Google ने भारतात आपले प्रीमियम वायरलेस इयरबड्स Pixel Buds Pro लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हे इयरबड्स 28 जुलै रोजी लॉन्च केले जातील. त्याचे प्री-बुकिंग 21 जुलैपासून सुरू होणार आहे. गुगलच्या या इअरबड्सना अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) आणि ऑडिओ स्विचिंग सारखे फीचर्स मिळतील. इयरबड्स पाणी आणि घाम रेसिस्टेंट देखील असतील. Pixel Buds Pro चार रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला जाईल. चला तर मग या इअरबड्सच्या इतर फीचर्सबद्दल जाणून घेऊया. (google pixel buds pro india launch date)
Pixel Buds Pro किंमत
Google च्या Pixel Buds Pro ला मे मध्ये $199 (सुमारे 15,400 रुपये) मध्ये लिस्ट केले गेले. भारतात त्याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. Pixel Buds Pro भारतासोबत अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जपान, तैवानसह इतर 12 देशांमध्ये लॉन्च केला जाईल. Pixel Buds Pro चारकोल, कोरल, फॉग आणि लेमनग्रास या चार कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केला जाईल.
Pixel Buds Pro ची बॅटरी
Pixel Buds Pro ला एका चार्जवर अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनसह 7 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो आणि अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन शिवाय 11 तास बॅटरी चालते. वायरलेस चार्जिंग केससह इयरबड 31 तासांपर्यंत चालू शकतात. कंपनीचा दावा आहे की चार्जिंगच्या पाच मिनिटांत इअरबड अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनसह 1 तास चालवता येतात.
Pixel Buds Pro चे स्पेसिफिकेशन्स
इयरबड्सनावॉटर आणि स्वेट रेसिस्टंससाठी IPX4 रेटिंग आणि केससाठी IPX2 रेटिंग आहे. USB Type-C चार्जिंगसह Pixel Buds Pro मध्ये वायरलेस चार्जिंग देखील देण्यात आली आहे. इयरबड्स मल्टीपॉइंट कनेक्टिव्हिटीसह येतात, जे एकाच वेळी एकापेक्षा जास्त उपकरणांशी कनेक्ट होऊ शकतात. इयरबड्स ब्लूटूथ v5.0, गुगल असिस्टंट, अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) आणि ट्रान्सपरंसी मोडसह येतात. हे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीशी कनेक्ट होऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.