नवी दिल्ली - गुगलने व्हायरस आढळल्यामुळे प्ले स्टोअरवरून एक अॅप डिलिट केलं आहे. malwarebytes ने याबाबतची माहिती दिली आहे. Barcode Scanner नावाच्या अॅपमध्ये व्हायरस डिटेक्ट झाल्यानं गुगलने ही कारवाई केली. व्हायरसचा फटका युजर्सना बसल्यानंतर बारकोड स्कॅनर अॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलं आहे.
रिपोर्टमध्ये अशी माहिती सांगण्यात आली आहे की, युजर्सना खूप जाहिराती दिसत होत्या. या जाहिराती त्यांच्या डिफॉल्ट ब्राउजरवरून ओपन होत होत्या. अॅपमध्ये व्हायरसची तक्रार मिळाल्यानंतर गुगलने त्वरीत हालचाली केल्या. अॅपला प्ले स्टोअरवरून एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलं होतं.
Malewarebytes च्या रिपोर्टनुसार, डिसेंबरच्या शेवटी फोरम युजर्सकडून डिस्ट्रेस कॉल येण्यास सुरुवात झाली. या युजर्सना सातत्यानं जाहिराती दिसत होत्या. त्यांच्या डिफॉल्ट ब्राउजरवरून या जाहिराती ओपन होत होत्या. विशेष म्हणजे तक्रार करणाऱ्यांपैकी कुणीही जी अॅप डाउनलोड केली नव्हती ती इन्स्टॉल झाली होती. यानंतर Anon00 नावाच्या एका युजरला Barcode Scanner अॅपवरून या जाहिराती मिळत असल्याचं आढळलं. बारकोड स्कॅनर हे अॅप एक कोटींहून अधिकवेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. आम्ही व्हायरस डिटेक्ट केला असून गुगलनेसुद्धा तात्पुरतं हे अॅप प्ले स्टोअरवरून हटवलं आहे.
युजर्सच्या मोबाइलमध्ये हे अॅप बराच काळ इन्स्टॉल होते. डिसेंबरमध्ये आलेल्या एका अपडेटनंतर बारकोड स्कॅनर एक मालशिअस अॅपमध्ये बदललं. 4 डिसेंबर 2020 मध्ये नवीन अपडेट रोलआऊट झालं होतं. या अॅप अपडेटमध्ये Android/Trojan.HiddenAds.AdQR हा कोड होता. यामुळे युजर्सच्या फोनमध्ये डिफॉल्ट ब्राउजरवर थर्ड पार्टी अॅड साइटवर जात होते. कंपनीने अॅप डिलिट करण्याचा सल्ला दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.