Unknown Tracker Alert : तुमच्यावर कोणी पाळत ठेवतंय? जवळच्या ट्रॅकिंग डिव्हाईसचा लगेच मिळणार अलर्ट; गुगलचं नवीन फीचर!

Google Safety Feature : गुगलच्या अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो आणि त्याहून नवीन ओएस असणाऱ्या स्मार्टफोन्सवर हे फीचर देण्यात येत आहे.
Unknown Tracker Alert Google
Unknown Tracker Alert GoogleeSakal
Updated on

अँड्रॉईड यूजर्सच्या सुरक्षेसाठी गुगलने एक मोठं पाऊल उचललं आहे. अननोन ट्रॅकिंग अलर्ट नावाचं एक फीचर कंपनीने लाँच केलं आहे. यामुळे आता अज्ञात उपकरणांच्या मदतीने कोणीही तुमची ट्रॅकिंग करु शकणार नाही. गुगलच्या अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो आणि त्याहून नवीन ओएस असणाऱ्या स्मार्टफोन्सवर हे फीचर देण्यात येत आहे.

कसं करेल काम?

गुगलने एका ब्लॉग पोस्टमधून याबाबत माहिती दिली आहे. एखाद्या अज्ञात उपकरणाने तुमचा स्मार्टफोन ट्रॅक केला जात असेल, तर यूजर्सना त्याबाबत अलर्ट मिळणार आहे. तुम्हाला अलर्टसोबतच स्क्रीनवर एक पॉप-अप मिळेल. यामध्ये तुमच्यासोबत ट्रॅकरने कुठे कुठे प्रवास केला आहे, याची एका मॅपवर माहिती मिळेल.

Unknown Tracker Alert Google
QR Scanner : आता दूर असलेला क्यूआर कोडही जागेवरुनच करता येणार स्कॅन; गुगल आणतंय नवीन फीचर

ट्रॅकर होणार डिटेक्ट

या फीचरमध्ये 'प्ले साऊंड' नावाचा एक पर्यायही मिळणार आहे. यामुळे यूजर्स अगदी सोप्या पद्धतीने आपल्या ट्रॅकरचा शोध लावू शकतील. सध्या या फीचरच्या माध्यमातून अ‍ॅपल एअरटॅगना ट्रॅक करणं शक्य आहे. लवकरच इतर कंपन्यांचे ब्लूटूथ ट्रॅकर्सही यात जोडले जातील. (Google safety alert)

असं वापरा फीचर

  • हे फीचर वापरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्मार्टफोनचं ब्लूटूथ ऑन करावं लागेल.

  • यानंतर तुम्हाला स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जावं लागेल.

  • त्यानंतर सेफ्टी अँड इमर्जन्सी ऑप्शन सिलेक्ट करा.

  • यानंतर तुम्हाला अननोन ट्रॅकर अलर्ट्स हा पर्याय दिसेल. यावर टॅप करून Allow Alerts हा पर्याय निवडा.

  • यानंतर तुम्हाला जवळपास असणाऱ्या ट्रॅकर्सची यादी दिसेल. तुम्ही स्कॅन नाऊ हा पर्याय निवडून जवळपास असणारे ब्लूटूथ ट्रॅकर्स शोधू शकता.

Unknown Tracker Alert Google
Fake My History : तुमच्या मृत्यूनंतर तुमची ब्राउजिंग हिस्ट्री आपोआप होणार 'पवित्र'; ऑपेराने लाँच केलं खास फीचर!

तुम्हाला मिळालं का?

गुगल सध्या टप्प्या-टप्प्याने हे फीचर सर्व स्मार्टफोनमध्ये लाँच करत आहे. त्यामुळे, तुम्हाला अद्याप हे फीचर मिळालं नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. येत्या काही दिवसांमध्ये सर्व स्मार्टफोनवर हे फीचर उपलब्ध करून दिलं जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.