Google Removes Multiple Indian Apps from Play-Store : गुगलने कित्येक भारतीय अॅप्सवर मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारपासून हे अॅप्स आपल्या प्ले-स्टोअरवरुन हटवण्यास गुगलने सुरूवात केली आहे. यामध्ये भारत मॅट्रिमॉनी, शादी डॉट कॉम, कुकू एफएम, अल्ट बालाजी अशा प्रसिद्ध अॅप्सचा देखील समावेश आहे. सर्व्हिस फी न दिल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं. (Tech News)
"कित्येक प्रस्थापित अॅप्सना प्ले-स्टोअरकडून भरपूर फायदा झाला आहे. मात्र त्यांनी सर्व्हिस फी दिलेली नाही." असं गुगलने म्हटलं. ही फी आधी 15 ते 30 टक्के एवढी होती. मात्र, अँटी कॉम्पीटिशन बॉडी CCI ने दिलेल्या आदेशांनंतर ही फी 11 ते 26 टक्के करण्यात आली होती. गुगलच्या प्लॅटफॉर्म फी बाबत कित्येक अॅप्सनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने कंपन्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर गुगलने ही कारवाई केली आहे.
गुगलने कारवाई केलेल्या अॅप्समध्ये Bharat Matrimony, Matrimony.com, Shaadi.com, Jeevansathi या मॅट्रिमॉनियल अॅप्सचा समावेश आहे. सोबतच ALTT (अल्ट बालाजी) हे ओटीटी अॅप, Kuku FM हे ऑडिओ अॅप आणि Quack Quack, Truly Madly या डेटिंग अॅप्सचा समावेश आहे. यासोबतच, Info Edge कंपनीचे Naukri.com, Naukri Recruiter, 99acres, Shiksha हे अॅप्स देखील डीलिस्ट करण्यात आलेले आहेत.
गुगलच्या या कारवाईवर भारतीय अॅप्सनी नाराजी व्यक्त केली आहे. गुगलने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक अॅप्स हटवण्यास सुरुवात केली असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. भारत मॅट्रिमॉनीचे फाऊंडर मुरुगावेल जानकीरामन यांनी हा दिवस भारतातील इंटरनेटसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं.
कुकू एफएमचे को-फाऊंडर विनोद कुमार मीना म्हणाले, की गुगल एका मोनोपॉलीप्रमाणे काम करत आहे. 'जीवनसाथी'च्या इन्फो एज कंपनीचे संस्थापक संजीव बिकाचंदानी म्हणाले, की त्यांनी वेळेवर गुगलला सगळी फी भरली असूनही ही कारवाई करण्यात आली. तर, क्वॅकक्वॅक अॅपचे फाऊंडर रवी मित्तल यांनी सांगितलं, की कंपनी गुगलने दिलेल्या नियमांचे पालन करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.