Google Account : ..तर तुमचं गुगल अकाउंट होईल कायमचं बंद! कंपनीचा यूजर्सना गंभीर इशारा

Google Warning : ३१ डिसेंबरपासून गुगल मोठ्या प्रमाणात अकाउंट डिलीट करणार आहे.
Google Account Warning
Google Account WarningeSakal
Updated on

गुगलने आपल्या यूजर्सना ई-मेल पाठवून एक गंभीर इशारा देण्यास सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबर २०२३ पासून गुगल असे अकाउंट बंद करणार आहे जे बऱ्याच काळापासून वापरण्यात आलेले नाहीत. अशा अकाउंट्सचा वापर सायबर गुन्हेगार करू शकतात, यामुळे कंपनीने हे पाऊल उचललं आहे.

कंपनीने मे महिन्यातच याबाबत घोषणा केली होती. यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा आपल्या यूजर्सना इशारा देणारा ई-मेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांपासून ज्या व्यक्तींनी आपलं गुगल अकाउंट वापरलं नाही, त्यांना कंपनी हे ईमेल पाठवत आहेत.

Google Account Warning
YouTube Account : यूट्यूब वापरताना एक चूक पडेल महागात; अकाउंट थेट होईल ब्लॉक!

काय आहे कारण?

गुगलच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंट विभागाच्या ग्लोबल व्हीपी क्रिशेली यांनी सांगितलं; की जुन्या बंद झालेल्या अकाउंटचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. सोबतच, असे अकाउंट बंद केल्यामुळे गुगलला भरपूर वेब स्पेस वापरता येणार आहे. (Google Account Ban)

रिकव्हरी मेलवर मिळेल इशारा

गुगल बऱ्याच काळापासून इनअ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या यूजर्सना इशारा देणारा ई-मेल पाठवत आहे. यूजर्सना त्यांच्या गुगल अकाउंटवर आणि त्यांनी सेट केलेल्या रिकव्हरी ई-मेल आयडीवर हा संदेश मिळत आहे. या इशाऱ्यानंतरही यूजर्सनी काहीच अ‍ॅक्शन घेतली नाही; तर त्यांचं अकाउंट बंद होणार आहे.

Google Account Warning
Google Genesis Tool : आता पत्रकारांच्या नोकऱ्या धोक्यात; गुगलने आणलं बातम्या अन् आर्टिकल लिहिणारं एआय टूल

असं अ‍ॅक्टिव्ह ठेवा अकाउंट

आपलं गुगल अकाउंट सुरू ठेवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला केवळ आपल्या अकाउंटवर लॉग-इन करण्याची गरज आहे. दोन वर्षातून किमान एक वेळा लॉग-इन केल्यास तुमचं अकाउंट सुरू राहील. तुम्ही जर नियमितपणे गुगलचा वापर ई-मेल पाठवणे, फोटो अपलोड करणे किंवा अन्य गोष्टींसाठी करत असाल; तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.