Google: ... तर स्मार्टफोनच्या किंमतीत होईल मोठी वाढ, गुगलने दिला इशारा

काही महिन्यांपूर्वी भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने (CCI) गुगलला जवळपास १३०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
Google
GoogleSakal
Updated on

Google vs CCI: भारतीय बाजारात लवकरच स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत दिग्गज टेक कंपनी गुगलने शक्यता वर्तवली आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने (CCI) गुगलला जवळपास १३०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याप्रकरणी आता कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने फोनच्या किंमती वाढू शकतात असे म्हटले आहे.

Google
Amazon Sale: मस्तच! अर्ध्या किंमतीत मिळतेय फुल ऑटोमेटिक Washing Machine, ऑफर एकदा पाहाच

काय आहे प्रकरण?

गेल्यावर्षी CCI ने दोन वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जवळपास १३०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. कंपनीने आपल्या वर्चस्वाचा बाजारातील स्पर्धा संपवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आऱोप करण्यात आला आहे. गुगलने अ‍ॅप डेव्हलपर्सवर काही अटी घातल्याचा आरोप आहे.

सीसीआयने गुगलला काही आदेश देखील दिले होते. गुगल मूळ मॅन्यूफॅक्चरला प्ले सर्व्हिस प्लगिन्सचा अ‍ॅक्सेस नाकारू शकत नाही, असे सीसीआयने म्हटले आहे. तसेच, केवळ गुगलच्या प्ले स्टोरवरच डेव्हलपर्सचे अ‍ॅप्स उपलब्ध असतील, असे निर्बंध कंपनी घालू शकत नाही, असे सीसीआयने म्हटले आहे.

सीसीआयनुसार गुगलने स्मार्ट मोबाइल डिव्हाइस, अँड्राइड स्मार्ट मोबाइल्स, जनरल वेब सर्च सर्व्हिस, नॉन-ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित मोबाइल वेब ब्राउजर आणि ऑनलाइन व्हीडिओ होस्टिंग प्लॅटफॉर्म्सला ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यास परवानगी देताना स्वतःच्या वर्चस्वाचा चुकीचा वापर केला आहे.

हेही वाचा: पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

गुगलचे म्हणणे काय?

टेक कंपनी गुगलने या प्रकरणावर ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून म्हणणे मांडले आहे. गुगलनुसार, आर्थिक फसवणूक करणाऱ्या अ‍ॅप्सची संख्या मोठी आहे. प्ले स्टोरवरील अ‍ॅप्ससाठी गुगल जबाबदार असते. मात्र, इतर प्लॅटफॉर्मवरील अ‍ॅप्स सुरक्षित आहेत की नाही, हे तपासू शकत नाही. अशा अ‍ॅप्समुळे भारतीय यूजर्सची खासगी माहिती चोरी होऊ शकते व राष्ट्रीय सुरक्षेसाठी देखील हे धोकादायक आहे.

अँड्राइडच्या वेगवेगळ्या व्हर्जनला ‘forks’ असे म्हटले जाते. गुगलनुसार, अँड्राइडच्या अशा वेगवेगळ्या व्हर्जनमुळे यूजर्सचे नुकसान होऊ शकते. गुगलद्वारे यूजर्सला पुरवला जाणारा सिक्योरिटी सपोर्ट देखील मिळणार नाही. तसेच, कंपन्यांनी स्वतःचे वेगळे अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जन तयार केल्यास खर्चात वाढ होईल. हे व्हर्जन सुरक्षित देखील नसतील. यामुळे भारतीय बाजारात स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ होईल.

सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

सीसीआयच्या निर्णयाच्याविरोधात Google ने National Company Law Appellate Tribunal कडे धाव घेतली होती. पण (NCLAT) ने निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर आता कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी १६ जानेवारीला होईल.

हेही वाचा: Face Recognition: फक्त चेहरा दाखवा आणि बँकेतून पैसे काढा, खातेधारकांसाठी येणार खास टेक्नोलॉजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()