Google Birthday Reminder : जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस सारखा विसरता? गुगल करेल तुम्हाला आठवण

यामुळे आता आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस विसल्यामुळे होणारे वाद टाळता येतील.
Google Birthday Reminder
Google Birthday ReminderEsakal
Updated on

वाढदिवस हा प्रत्येकासाठीच खास असतो. मात्र, बऱ्याच वेळा लोक आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस विसरून जातो. कितीतरी वेळा आपल्याला काही दिवस आधी लक्षात येतं, मात्र बरोबर त्या दिवशी आपण ही गोष्ट विसरून जातो. तुम्हाला देखील अशीच अडचण येत असेल, तर आता गुगल याबाबतीत तुमची मदत करणार आहे.

Google Birthday Reminder
WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅपवर आले नवीन फीचर्स! इंटरफेसमध्ये बदल, यूजरनेम ठेवता येणार

गुगलने आपल्या यूजर्ससाठी बर्थडे रिमाईंडर (Google Birthday Reminder) नावाचं नवीन फीचर लाँच केलं आहे. याचा वापर करुन तुम्ही आपल्या कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचा बर्थडे सेव्ह करून ठेऊ शकता. संबंधित व्यक्तीच्या बर्थडेला गुगल स्वतःहून तुम्हाला एक रिमाईंडर देईल.

अशी करा सेटिंग

ही सेवा ऑन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल कॉन्टॅक्टचे (Google Contacts) लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. यानंतर हे अ‍ॅप ओपन करून खाली असलेल्या हायलाईट पेज या पर्यायावर टॅप करा. यानंतर तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन होईल.

Google Birthday Reminder
Google : भारत सरकार करणार गुगलवर कारवाई, पोझिशनचा गैरवापर केल्याचा आहे आरोप

कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला संबंधित व्यक्तीचे नाव सिलेक्ट करावे लागेल. यानंतर कॉन्टॅक्टमध्ये त्या व्यक्तीचा जन्मदिन कधी आहे ही माहिती भरावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सेव्ह करणं गरजेचं आहे.

नोटिफिकेशन करा ऑन

केवळ माहिती सेव्ह करून तुम्हाला बर्थडेला रिमाईंडर मिळणार नाही. यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन हा पर्याय देखील ऑन करावा लागेल. वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असणारे टॉगल टॅप करून तुम्ही हा पर्याय ऑन करू शकता. यानंतर संबंधित व्यक्तीच्या बर्थडेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळू शकेल.

यामुळे आता आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस विसल्यामुळे होणारे वाद टाळता येतील. शिवाय नेहमी बर्थडे लक्षात ठेवल्यामुळे त्या व्यक्तीवर तुमचे चांगले इम्प्रेशन पडेल.

Google Birthday Reminder
Tech Hacks : गुगल चोरू शकणार नाही तुमचा डेटा, अकाउंटमध्ये करा फक्त 'ही' सेटिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.