आता तुमचा स्मार्टफोनच असणार तुमच्या कारची चावी; Google आणणार भन्नाट फिचर

आता तुमचा स्मार्टफोनच असणार तुमच्या कारची चावी; Google आणणार भन्नाट फिचर
Updated on

नागपूर : आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात अशक्य असं काहीच नाही. स्मार्टफोनमुळे (Smartphones)आता आपली अनेक कामं अगदी सोपी होतात. अगदी घरातील लाईट, पंखे ऑन-ऑफ करणं असो की ब्लड प्रेशर (Blood Pressure Monitor) तपासणं या सर्व गोष्टींसाठी तुमचा स्मार्टफोनच पुरेसा आहे. नवनवीन अप्लिकेशन्समुळे हे शक्य होतं. आता स्मार्टफोन्स यूजर्ससाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. आता कारची चावी जवळ बाळगण्याची अजिबात गरज नाही. कारण तुच्या स्मार्टफोनमध्येच तुमच्या कारची चावी असणार (Digital Key feature) आहे. Google लवकरच हे डिजिटल की फिचर आणणार आहे. (Google will launch Digital Key feature soon for Cars)

आता तुमचा स्मार्टफोनच असणार तुमच्या कारची चावी; Google आणणार भन्नाट फिचर
Google Maps पुढील काळात आणणार 'हे; महत्वाचे फीचर्स; जाणून घ्या

Google ना नुकतीच 2021 I/O डेव्हलपर कॉन्फरन्स घेतली. यात BMW सह इतर काही कारमध्ये हे नवीन फीचर्स आणण्याबाबत घोषणा केली आहे. लवकरच गुगल अँड्रॉइड 12 (Google android 12 update) च्या अपडेटसह हे डिजिटल की फिचर लाँच करणार आहे. यामध्ये कारच्या मालकांना कार सुरु करणं, बंद करणं आणि लॉक-अनलॉक करण्याचीही सुविधा मिळणार आहे. मात्र हे नक्की कसं काम करणार याबाबत अजूनही कुठलीही ठोस माहिती देण्यात आली नाही.

ही डिजिटल की अल्ट्रा वाईडबँड टेक्नॉलॉजीवर (Ultra-Wideband technology) काम करेल. यात रेडिओ ट्रान्स्मिशनच्या माध्यमातून सिग्नल्स पोहोचतील. यात सेन्सरची भूमिका महत्वाची आहे. सेन्सर या सिग्नल्सना एका रडारप्रमाणे योग्य ती दिशा दाखवेल. तुमच्या स्मार्टफोनचा अँटिना हे सिग्नल्स घेईल आणि त्यामुळे स्मार्टफोन कारसोबत कनेक्ट होण्यास मदत होईल.

असणार NFC टेक्नॉलॉजी

NFC म्हणजे near-field communication. यात कारच्या मालकांना कुठल्याही जवळपासच्या जागेवरून आपली कार लॉक किंवा अनलॉक करता येणार आहे. यासाठी तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही फक्त तुमच्या स्मार्टफोनवर एक टॅप करण्याची गरज असणार आहे.

शेअर करा डिजिटल की

जर तुम्ही तुमची कार एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला काही दिवसांसाठी देऊ इच्छित असाल तर हेच फिचर तुमच्या कामी येणार आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार ही डिजिटल की तुम्ही कोणासोबतही अगदी सुरक्षित रित्या शेअर करू शकणार आहात.

या यूजर्सना मिळणार सुविधा

गुगलच्या म्हणण्यानुसार ही डिजिटल की फिचर सर्वच स्मार्टफोन्समध्ये उलब्ध नसेल. काही सुरक्षित आणि बड्या कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये हे फिचर उपलब्ध असणार आहे. गुगल पिक्सल तसंच सॅमसंगच्या काही मोबाईल्समध्ये हे फिचर असेल. तसंच सर्वच कारमध्ये हे फिचर नसणार आहे. हे फिचर तुमच्या कारमध्ये असावं यासाठी नक्कीच तुमच्याकडून जास्त पैसे आकारण्यात येणार आहेत.

आता तुमचा स्मार्टफोनच असणार तुमच्या कारची चावी; Google आणणार भन्नाट फिचर
Audio App Clubhouse नं लाँच केलं नवीन payment फिचर; असं करा easy payment 

BMW मध्ये येणार फिचर

गुगलच्या म्हणण्यानुसार, BMW या डिजिटल की फीचरसोबत पार्टनर असल्यामुळे BMW कारमध्ये हे फिचर सर्वात आधी येणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 2022.पासून हे फिचर BMW कारमध्ये असणार आहे.

(Google will launch Digital Key feature soon for Cars)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.