Google Spam E-Mails : त्रासदायक स्पॅम ई-मेल्सना आळा घालण्यासाठी आता गुगलने एआय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घ्यायचं ठरवलं आहे. गुगल एक नवीन एआय पावर्ड स्पॅम डिटेक्शन सिस्टीम तयार करणार आहे. यामुळे विविध प्रकारच्या आयडिया करुन सिक्युरिटी फिल्टरला चकवणाऱ्या स्पॅम मेल्सना दणका बसणार आहे.
गुगल सध्या स्पॅम मेल्स डिटेक्ट करण्यासाठी RETV या फिल्टरचा वापर करतं. रेसिलियंट अँड इफिशिअंट टेक्स्ट व्हेक्टोरायझर असं या फिल्टरचं नाव आहे. एखाद्या ई-मेल किंवा कंटेंटमधील टेक्स्टला स्कॅन करुन जीमेल, यूट्यूब आणि गुगल प्ले या ठिकाणी हार्मफुल कंटेंट फिल्टर केला जातो.
टेक्स्ट-आधारित फिल्टरचा सर्वात मोठा तोटा म्हणजे, या फिल्टरला चकवणं सोपं आहे. ईमेल कंटेंटमध्ये स्पेशल कॅरेक्टर, इमोजी, टायपो अशा प्रकारची काहीतरी शक्कल लढवून या फिल्टरची दिशाभूल केली जात होती.
आता गुगल याच सॉफ्टवेअरला एआयच्या मदतीने अपडेट करणार आहे. नवीन अपडेटेड फिल्टरमध्ये फिशिंग मेल्सना थांबण्यासाठी निश्चित अशा शब्दांना चाळण्याची गरज भासणार नाही. तसंच हे एआय टूल 100 हून अधिक भाषांवर आउट-ऑफ-दि-बॉक्स काम करेल. (Tech News)
जीमेलचं हे नवीन स्पॅम डिटेक्शन टूल अँड्रॉईड, आयओएस आणि वेब व्हर्जन अशा सर्व ठिकाणी काम करणार आहे. यामुळे यूजर्सपर्यंत स्पॅम मेल्स पोहोचणार नाहीत. दरम्यान, गुगलने आपल्या यूजर्ससाठी नवा सिक्युरिटी अपडेट दिला आहे. यामुळे विविध प्रकारच्या 85 त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डिसेंबरमधील हा सिक्युरिटी अपडेट इन्स्टॉल करण्याचं आवाहन कंपनीने केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.