OTT Platforms Blocked : अश्लील अन् हिंसक कंटेंट दाखवणारे 18 ओटीटी प्लॅटफॉर्म केले ब्लॉक; मोदी सरकारची मोठी कारवाई

Government Action : ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या 19 वेबसाईट्स, 10 अ‍ॅप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल्सना ब्लॉक करण्यात आलं आहे.
OTT Platforms Blocked
OTT Platforms BlockedeSakal

Vulgar OTT Platforms Blocked by Government : सध्या देशात कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्रासपणे अश्लील अन् हिंसक कंटेंट दाखवला जातो. मात्र आता अशा प्लॅटफॉर्म्सवर मोदी सरकारने मोठी कारवाई केली आहे. व्हल्गर कंटेंट दाखवणाऱ्या 18 OTT प्लॅटफॉर्म्सना सरकारने ब्लॉक केलं आहे. सोबतच अशा वेबसाईट्स, अ‍ॅप्स आणि या ओटीटींचे सोशल मीडिया हँडलही ब्लॉक करण्यात आले आहेत.

आयबी मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या 19 वेबसाईट्स, 10 अ‍ॅप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल्सना ब्लॉक करण्यात आलं आहे. यापूर्वी भारत सरकारने गेल्या वर्षी नेटफ्लिक्स, डिज्नी आणि इतर मुख्य ओटीटींना आपल्या कंटेंटचं स्वतंत्रपणे मॉडरेशन करण्यास सांगितलं होतं.

OTT Platforms Blocked
Kerala State OTT Platform : केरळ राज्य सरकारनं सुरू केला 'ओटीटी प्लॅटफॉर्म'! जाणून घ्या काय आहे नियमावली?

कोणत्या ओटीटींचा समावेश

कारवाई करण्यात आलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये कित्येक मोठी नावं आहेत. संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे -

  • रॅबिट (Rabbit)

  • निऑन एक्स व्हीआयपी (Neon X VIP)

  • हंटर्स (Hunters)

  • हॉट शॉट्स व्हीआयपी (Hot Shots VIP)

  • मोजफ्लिक्स (Mojflix)

  • मूडएक्स (MoodX)

  • बेशरम्स (Besharams)

  • अनकट अड्डा (Uncut Adda)

  • ट्रिफ्लिक्स (Tri Fliks)

  • एक्स प्राईम (X Prime)

  • न्यूफ्लिक्स (Nuefliks)

  • प्राईम प्ले (Prime Play)

  • चिकूफ्लिक्स (Chikooflix)

  • फुगी (Fugi)

  • एक्स्ट्रामूड (Xtramood)

  • ड्रीम्स फिल्म्स (Dreams Films)

  • वूव्ही (Voovi)

  • येस्मा (Yessma)

OTT Platforms Blocked
Regional OTT : मोठ्या ब्रँड्सची पोकळी भरुन काढतायत स्थानिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स; यावर्षी नॉन-हिंदी कंटेंटवर भर..

केवळ ओटीटी प्लॅटफॉर्मच नाही, तर असे कंटेंट दाखवणाऱ्या वेबसाईट्स, अ‍ॅप्स आणि सोशल मीडिया हँडल्सनाही ब्लॉक करण्यात आलं आहे. यामध्ये 12 फेसबुक पेजेस, 17 इन्स्टाग्राम पेजेस, 16 एक्स (ट्विटर) हँडल्स आणि 12 यूट्यूब चॅनल्सचा समावेश आहे. एकूण 19 वेबसाईट्स, 10 अ‍ॅप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com