तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर सावधान! सरकारने दिला गंभीर इशारा

government issues warning alert on google chrome do it immediately detail
government issues warning alert on google chrome do it immediately detail
Updated on

Google Chrome Alert : तुम्हीही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर ब्राउझिंगसाठी गुगल क्रोम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. गुगल क्रोम वापरणाऱ्यांना भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. हा इशारा आयटी मंत्रालयाच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (SERT-In) ने डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला आहे. SERT-In नुसार, Google Chrome मध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स सहजपणे संगणक हॅक करू शकतात. SERT-In ने यापूर्वी Apple iOS, Apple iPad आणि MacOS मधील बग्सबाबत अलर्ट जारी केला होता.

गुगल क्रोममध्ये काय त्रुटी आढळल्यात?

SERT-In च्या अॅडवायजरीनुसार, Google Chrome मध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन, हॅकर्स तुमच्या सिस्टमवर क्राफ्टेड रिक्वेस्ट अटॅकर्स आर्बिटरी कोड एक्झीक्यूट करु शकतात. हा कोड तुमच्या कॉम्प्युटरच्या सुरक्षिततेला बायपास करू शकतो आणि तुमची सिस्टम पूर्णपणे हॅक करू शकतो. याआधी SERT-In ने Apple iOS, Apple iPad आणि MacOS च्या बग्सबाबत असा अलर्ट दिला होत. अॅपल उपकरणांच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक बग आहे, ज्याचा हॅकर्सकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. यानंतर अॅपलने आपल्या यूजर्सला तात्काळ इमरजेंसी अपडेट अपडेट करण्यास सांगितले.

government issues warning alert on google chrome do it immediately detail
मारुतीची नवीन Alto K10 लाँच; देते 25km मायलेज

सुरक्षिततेसाठी काय कराल?

हॅकिंग टाळण्यासाठी, वापरकर्त्यांना प्रथम त्यांचे Google Chrome चे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच, वापरकर्त्यांनी अज्ञात लिंकवर क्लिक करणे आणि अनोळखी वेबसाइटला भेट देणे टाळावे.

government issues warning alert on google chrome do it immediately detail
Viral Video : सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण, महिलेला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.