Fake Review Guidelines : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील फेक रिव्ह्यूंना बसणार चाप! सरकार आणणार नवी पॉलिसी

Fake reviews on e-commerce platforms will be rampant: ऑनलाईन शॉपिंग करताना एखादी गोष्ट कशी आहे हे तपासण्यासाठी आपल्याकडे जास्त पर्याय नसतात. फोटो किंवा व्हिडिओ हे फसवे असू शकतात. त्यामुळे आपण त्या वस्तूचे रिव्ह्यू कसे आहेत हे तपासतो.
Fake Review Guidelines
Fake Review GuidelineseSakal
Updated on

Guidelines For E-Commerce Sites : ऑनलाईन शॉपिंग करताना एखादी गोष्ट कशी आहे हे तपासण्यासाठी आपल्याकडे जास्त पर्याय नसतात. फोटो किंवा व्हिडिओ हे फसवे असू शकतात. त्यामुळे आपण त्या वस्तूचे रिव्ह्यू कसे आहेत हे तपासतो. यामध्ये पूर्वी ज्यांनी ती वस्तू घेतली आहे, त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या असतात. यावरुन एखादी वस्तू चांगली आहे की नाही हे ठरवता येतं.

कित्येक कंपन्या आपली वस्तू चांगलीच आहे हे दिसावं यासाठी खोटे रिव्ह्यूदेखील लिहून घेतात. अशाच खोट्या रिव्ह्यूंवर आळा बसावा यासाठी केंद्र सरकार आता नवीन पॉलिसी आणणार आहे. कंझ्युमर अफेअर्स विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी मनीकंट्रोलच्या एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. (Policy for Fake Reviews)

"आपण एखाद्या वस्तूचे रेटिंग 4.5 स्टार पाहतो, आणि आपल्याला वाटतं ती चांगली वस्तू आहे. मात्र तुम्हाला माहिती नसतं की ती वस्तू विकणारी व्यक्ती कोण आहे? हे स्टार रेटिंग्स खरे आहेत याची तपासणी कोण करतंय? यामुळेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने एक मानक निश्चित केलं आहे, जेणेकरून खोट्या रिव्ह्यूंना आळा बसेल." (Fake Review on E-com sites)

Fake Review Guidelines
Coaching Center Guidelines : खासगी क्लासेसमध्ये पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांवर बंदी; नव्या गाईडलाईन्स जारी

'डार्क पॅटर्न'लाही आळा

सिंह यांनी यावेळी डार्क पॅटर्नबद्दलदेखील माहिती दिली. कित्येक ई-कॉमर्स कंपन्या चुकीची माहिती देऊन, एखाद्या वस्तूचा स्टॉक संपत आला आहे सांगून, कार्टमध्ये स्वतःच काही वस्तू जोडून किंवा अन्य प्रकारे ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या या गोष्टींना आळा घालण्यासाठी केंद्राने गेल्याच महिन्यात गाईडलाईन्स जारी केल्या असल्याचं सिंह यांनी सांगितलं. (What is Dark Pattern)

अनसबस्क्राईब करणं होणार सोपं

कित्येक वेळा आपण पाहतो की एखाद्या सेवेचं ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेण्यासाठी केवळ एक क्लिक पुरेसा असतो. मात्र, ती सेवा बंद करायची असल्यास त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. याबाबत देखील गाईडलाईन्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती सिंह यांनी दिली. ( Unsubscribing will be easy)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()