Wikipedia: भारत सरकारने विकिपीडियाला एक पत्र पाठवले असून यात काही तक्रारींबद्दल उत्तर मागितले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार विकिपीडियावर पक्षपातीपणा आणि चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विकिपाडियाला मध्यस्थाऐवजी प्रकाशक का समजू नये, असा सवालही सरकारने केल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार इंटरनेट इनसायक्लोपीडियाला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, संपादकांच्या एक लहान समुहाचा मजकुरावर जास्त कंट्रोल आहे, त्यामुळे तो मजकुरात तटस्थता नाही. मात्र भारत सरकार व विकिपीडियाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.