Digital Detox Initiative by Government : आजकाल आपण पूर्णपणे तंत्रज्ञान आणि गॅजेट्सने वेढलेलो आहोत. सोशल मीडियाचा अतिवापर, डीपफेक तंत्रज्ञान, ऑनलाईन स्कॅम अशा कित्येक गोष्टींचा धोका आपल्याला असू शकतो. एवढंच नाही, तर मोबाईल-टॅबलेट किंवा लॅपटॉप अशा गॅजेट्सच्या अति वापराने मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. यामुळेच आता कर्नाटक सरकारने 'डिजिटल डीटॉक्स' मोहिम सुरू केली आहे.
कर्नाटक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम ऑल इंडिया गेम डेव्हलपर्स फोरमसोबत मिळून राबवण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक भर हा गेमिंग आणि सोशल मीडियावर देण्यात येईल. राज्याचे आयटी मंत्री प्रियंक खर्गे यांनी याबाबत माहिती दिली. (Karnataka Govt Digital Detox)
खर्गे म्हणाले, की जबाबदारीने तंत्रज्ञान वापरण्यावर आम्ही भर देणार आहोत. तंत्रज्ञानाच्या अति वापराचा सर्वाधिक परिणाम तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. लोक डिजिटल जगावर अधिक विसंबू लागले आहेत. तसंच, तरुणवर्ग हा मोठ्या प्रमाणात स्क्रीनला चिकटून असलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे या डिजिटल डीटॉक्स मोहिमेमध्ये तरुणांच्या मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष दिलं जाणार आहे. (Technology and Mental Health)
कर्नाटक सरकार ऑनलाईन आणि ऑफलाईन डीटॉक्स सेंटर उभारण्याच्या विचारात आहे. यामध्ये स्क्रीन-टाईमचा सदुपयोग कसा करायचा, सोशल मीडियापासून ब्रेक कसा घ्यायचा, गॅजेट्सचा अतिवापर कसा टाळायचा अशा प्रकारच्या गोष्टींबाबत मार्गदर्शन केलं जाईल. (Digital Detox Center)
यासाठी कर्नाटक सरकार, AIDGF आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (NIMHANS) हे संयुक्तपणे मोहीम राबवणार आहेत. डिजिटल वेलनेस वाढवण्यासाठी ही मोहीम काम करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.