BGMI Ban in India : पब्जीनंतर आता BGMI देखील बॅन करणार सरकार? रिपोर्टमध्ये दावा; सीमा हैदरशी आहे कनेक्शन

Krafton Games : क्राफ्टॉनच्या PUBG या बॅटल रॉयल गेमला बॅन केल्यानंतर, कंपनीने भारत सरकारच्या नियमांनुसार BGMI ही गेम भारतात लाँच केली होती.
BGMI Ban in India
BGMI Ban in IndiaeSakal
Updated on

Govt Might Ban BGMI Game : काही वर्षांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने कित्येक चिनी अ‍ॅप्स बॅन केले होते. यामध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या PUBG या गेमचाही समावेश होता. क्राफ्टॉनच्या या बॅटल रॉयल गेमला बॅन केल्यानंतर, कंपनीने भारत सरकारच्या नियमांनुसार BGMI ही गेम भारतात लाँच केली होती. मात्र आता या गेमलाही सरकार बॅन करू शकतं, अशी शक्यता आहे. (Battlegrounds Mobile India)

याबाबत भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने न्यूज18 या वृत्तसंस्थेला माहिती दिली. या गेममुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे, म्हणून संरक्षण संस्थांनी सरकारकडे या गेमवर निर्बंध लागू करण्याबाबत प्रस्ताव मांडला आहे; असं या अधिकाऱ्याने सांगितलं. (BGMI Game Threat)

सीमा हैदर आहे कारण?

याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर (Who is Seema Haider) यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. 2019 साली पब्जी हा ऑनलाईन गेम खेळताना पाकिस्तानच्या सीमाची भारतातील सचिन मीना या नागरिकाशी ओळख झाली होती. त्यानंतर 2023 च्या मार्च महिन्यात सीमा आणि सचिन नेपाळमध्ये भेटले, आणि तिथेच लग्न करून सचिन सीमाला भारतात घेऊन आला होता. सीमा पाकिस्तानी हेर असू शकते या संशयावरुन जुलै महिन्यात यूपी पोलिसांनी तिला आणि सचिनलाही अटक केली होती.

BGMI Ban in India
BGMI Sanhok : प्रो गेमर व्हायचं असेल, तर मिस करू नका 'हे' टॉप लँडिंग स्पॉट्स.. जाणून घ्या

सायबर हल्ल्यांची भीती

याव्यतिरिक्त, PUBG आणि अशाच गेम्सच्या मदतीने पाकिस्तानमधून भारतावर सायबर हल्ले केले जाण्याची शक्यताही संरक्षण संस्थांनी व्यक्त केली. तसंच, या गेमचा डेटा चोरून तो इतर देशांना विकला जाण्याचीही भीती आहे.

कधी होणार निर्णय?

न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणांचा तपास करण्यासाठी सरकारने क्राफ्टनकडून काही प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. कंपनीकडून ही उत्तरे मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. याप्रकरणी सरकार पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.

BGMI Ban in India
Garuda Saga : BGMI बनवणाऱ्या कंपनीने भारतीयांसाठी लाँच केली खास नवी गेम! प्री-रजिस्ट्रेशन झालं सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.