जगभरातील गेमर्ससाठी GTA गेम ही एक पर्वणीच असते. या गेमचं पुढचं व्हर्जन, म्हणजेच GTA 6 लाँचसाठी सज्ज झाली आहे. मात्र, त्यापूर्वीच याबाबत कित्येक लीक्स आणि रुमर्स समोर येत आहेत. यातील एक रुमर म्हणजे, ही गेम निंतेंदो स्विचवर देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी लाँच झालेली GTA V ही गेम प्लेस्टेशन सोबतच एक्सबॉक्स आणि कम्प्युटरवर देखील लाँच करण्यात आली होती. मात्र, आता याचं पुढचं व्हर्जन या सर्व प्लॅटफॉर्म सोबतच Nintendo Switch 2 या कन्सोलवर देखील रिलीज करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेमिंग डिबेट्सने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
निंतेंदो स्विच 2 हे अधिक अपग्रेडेड गेमिंग कन्सोल आहे. हे कन्सोल पुढील वर्षीच्या शेवटी लाँच केलं जाऊ शकतं. यामध्ये 12GB RAM, DLSS 3.1 आणि रे-ट्रॅकिंग क्षमता असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळेच या कन्सोलवर अधिक प्रभावीपणे GTA 6 खेळली जाऊ शकते. त्यामुळेच या प्लॅटफॉर्मवर देखील ही गेम उपलब्ध केली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.
निंतेंदो कंपनी ही आपल्या पोकेमॉन, लेजंड ऑफ झेल्डा, मारिओ कार्ट अशा प्रकारच्या गेम्ससाठी ओळखली जाते. मात्र, त्यांनी यापूर्वी देखील EA स्पोर्ट्स, मार्व्हल आणि इतर गेमिंग कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. त्यामुळेच, आता रॉकस्टार सोबत करार करुन GTA VI ही गेमदेखील स्विचवर घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याबाबत खरी माहिती गेम लाँच झाल्यानंतरच समोर येईल. (Online Gaming)
दुसऱ्या एका लीकमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी 'GTA 6' गेमचा फर्स्ट लुक समोर येऊ शकतो. मात्र, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.