येतेय हार्ले-डेव्हिडसनची परवडणारी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स

Harley-Davidson
Harley-Davidson
Updated on

जगप्रसिध्द बाइक निर्माता कंपनी हार्ले-डेव्हिडसन (Harley-Davidson) लवकरच त्यांचे प्रीमियम इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) ब्रँड लाइव्ह वायर (LiveWire) अंतर्गत अनेक खिशाला परवडतील अशा इलेक्ट्रिक बाइक्स (Electric Bike) सादर करण्याच्या तयारीत आहे. काही आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, कंपनी पुढील काही वर्षांमध्ये S2 Del Mar लॉंच करणार आहे .

कंपनीच्या नवीन प्रोप्रायटरी स्केलेबल मॉड्यूलर एरो (Arrow) प्लॅटफॉर्मवर ही बाईक तयार केले जाईल. ही बाईक मिडलवेट सेगमेंटमध्ये चेडर-फ्रेंडली एडीशन म्हणून ही गाडी लॉंच केली जाईल आणि भविष्यात या प्लॅटफॉर्मचा वापर करून आणखी अनेक मॉडेल लॉन्च करण्यात येणार आहेत.

मिडलवेट LiveWire S2 (System 2) मॉडेलनंतर हार्ले याच प्लॅटफॉर्मवर बेस असलेल्या आणखी बाईक लॉंच करणार आहे. त्यामध्ये LiveWire S3 मॉडेलची नवीन लाइटवेट सीरीज आणि LiveWire S4 मॉडेलची हेवीवेट सीरीज असेल. मात्र HD LiveWire One हे ब्रँडचे प्रिमियम मॉडेल देखील त्याच्या भरमसाठ किमतीला खरेदी करता येईल.

Harley-Davidson
स्वस्तात मस्त बेस्ट फॅमिली कार; किंमत 5 लाखांपेक्षा कमी

नवीन एरो (Arrow) प्लॅटफॉर्म सध्याच्या LiveWire One च्या बॅटरी-स्टोअर-इन-फ्रेम फंक्शनला बायपास करेल कारण यामध्ये बॅटरीवर अधिक ताण पडत असल्याचे दिसून आले आहे. KTM SuperDuke R, BMW Motorrad च्या R1100RS, किंवा डुकाटी लाइनअपमध्ये देखील हे पाहायला मिळेत. नवीन प्लॅटफॉर्ममध्ये मोटर, बॅटरी, इन्व्हर्टर आणि ऑन-बोर्ड चार्जर असेल जे विविध कॉन्फिगरेशनमध्ये वापरले जाऊ शकते.

S1 गाडी मध्यमवर्गीयांसाठी बनवण्यात येईल आणि त्यामुळे ही बाइक LiveWire One सारखा जबरदस्त मोटर परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. कंपनी हे नवीन इलेक्ट्रिक बाइकचे मॉडेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील सादर करेल. तसेच नजीकच्या काळात याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Harley-Davidson
'दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीत'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()