हार्ले डेव्हिडसनची X440 ही नवी बाईक काही महिन्यांपूर्वी भारतात लाँच करण्यात आली होती. काही दिवसांमध्येच हार्लेच्या 25,000 हून अधिक बाईक्स बुक झाल्या आहेत. एक सप्टेंबरपासून या गाड्यांची टेस्ट राईड सुरू करण्यात आली होती. आता या महिन्यापासून हार्लेच्या या गाडीची डिलिव्हरी सुरू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून Harley-Davidson X440 ची डिलिव्हरी सुरू होणार आहे. हार्लेची ही सर्वात स्वस्त बाईक असल्याचं म्हटलं जात आहे. एवढंच नाही, तर 16 ऑक्टोबरपासून या गाडीची बुकिंग विंडो पुन्हा उघडली जाणार असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
ही बाईक डेनिम, विविड आणि एस अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, या बाईक्स 2,39,500 रुपये (डेनिम), 2,59,500 रुपये (विविड) आणि 2,79,500 रुपये (एस) अशा किंमतींना उपलब्ध आहेत. हार्लेने हीरोसोबत पार्टनरशिपमध्ये ही 'मेड इन इंडिया' हार्ले बाईक बनवली आहे.
नावाप्रमाणेच या गाडीमध्ये 440 CC क्षमतेचं ड्युअल व्हॉल्व्ह, सिंगल सिलिंडर इंजिन दिलं आहे. हे इंजिन एअर-ऑईल्ड कूल आहे. हे इंजिन 27.6bhp क्षमतेची पॉवर आणि 38nm पीक टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.