हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक एवी लोएब यांनी एक मोठा शोध लावला आहे. प्रशांत महासागरामध्ये यूएफओ, म्हणजेच उडत्या तबकडीचे अवशेष मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी प्रशांत महासागरात एक उल्कापिंड येऊन पडले होते. हे उल्कापिंड दुसऱ्या एखाद्या ग्रहावरून पृथ्वीवर पाठवले असण्याची शक्यता एवी यांनी व्यक्त केली होती.
यावर्षी मार्च महिन्यातच एवी यांनी या उल्केचे तुकडे शोधून काढण्यासाठी मोहीम सुरू करण्याची घोषणा केली होती. २०१४ साली एक इंटरस्टेलर वस्तू अवकाशातून पृथ्वीवर पडली होती. पृथ्वीच्या वातावरणात येऊनही ही उल्का जळून नष्ट झाली नव्हती. त्यामुळे ही उल्का विशेष असल्याचं एवी म्हणाले होते. (UFO Debris found in Ocean)
"पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या स्तरात पोहोचूनही ही वस्तू जळून गेली नव्हती. या उल्केवर भरपूर दबाव पडूनही ती सुस्थितीत होती. म्हणजेच ही वस्तू अगदी कडक असू शकते. कदाचित ती आपल्याकडे असणाऱ्या लोखंडापेक्षाही मजबूत असू शकते. ही वस्तू कुणी बनवली असेल का? किंवा मग ही वस्तू कुणी पृथ्वीकडे पाठवली असेल का?" असं एवी यांनी म्हटलं होतं.
या उल्केमधून आता एवी यांना सुमारे ५० मायक्रोस्कोपिक पार्टिकल मिळाले आहेत. हे पार्टिकल्स धुळीप्रमाणे दिसतात. यांचं एकत्रित वजन हे ३५ मिलिग्रॅम आहे, अशी माहिती लोएब यांनी दिली. नासाने आतापर्यंत जेवढे अवकाशातील दगड शोधले आहेत, त्यापेक्षा ही उल्का कित्येक पटींनी मजबूत असल्याचं एवी म्हणाले.
गोल आकाराचे कण
एवी यांनी सांगितलं, "आम्हाला जे कण मिळाले, ते बरोबर गोल आकाराचे होते. पावसाच्या पाण्याचे थेंब जसे दिसतात तसेच ते कण आहेत. माझ्या मुलीने विचारलं, की ती त्यातल्या एका कणाचा नेकलेस म्हणून वापर करू शकते का? मात्र, तो कण अगदीच छोटा असल्यामुळे मी तिला नाही म्हणालो."
ऐतिहासिक घटना
हे पार्टिकल समुद्रातून बाहेर काढण्यासाठी अगदी शक्तिशाली लोहचुंबकांचा वापर करण्यात आला. एखादे इंटरस्टेलर मटेरिअल हाताळण्याची ही मानवांची पहिलीच वेळ आहे. एलियन्सनी जणू आपल्याला हे पॅकेजच पाठवलं आहे, असं एवी म्हणाले. हे कण आता लॅबमध्ये नेण्यात येणार असून, त्यावर पुढील चाचण्या केल्या जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.