या विमानात असणार हायटेक सोयी-सुविधा; फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

या विमानात असणार हायटेक सोयी-सुविधा; फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क
Updated on

कोरोनामुळे (Corona Updates) सर्व जण सध्या घरीच आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्यासाठी आपण सर्वच जण उत्सुक असतो. मग अगदी मामाच्या गावाला जाण्यापासून ते विदेशात जाण्यापर्यंत आपण ट्रिप्स (Foreign tours) प्लॅन करत असतो. त्यात दूरवरचा विमानाचा प्रवास म्हंटलं की पर्वणीच. मात्र अनेकदा विमानात प्रवाशांची गर्दी असल्यामुळे काही लोकांना त्रास होतो. पारंपरिक फ्लाईट्समध्ये तर जागाही नसते. मात्र आता या सर्व समस्यांवर उपाय आलाय. इंग्लंडच्या एका कंपनीनं असं विमान तयार केलंय ज्यात तुम्हाला हायटेक (High tech Airship) सोयी सुविधा मिळतील. चला तर आग जाणून घेऊया या खास विमानाबद्दल. (HAV company will introduce Airlander 10 airship know features)

या विमानात असणार हायटेक सोयी-सुविधा; फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क
दहावीच्या मूल्यांकनाचा निर्णय चुकीचाच; शिक्षकांची प्रतिक्रिया

मूळच्या इंग्लंडच्या असलेल्या हायब्रीड एअर व्हेइकल्स (Hybrid Air Vehicles) या कंपनीनं विमानाची निर्मिती केली आहे. Airlander 10 असं नाव या खास विमानाला देण्यात आलंय. या विमानात १०० प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे पारंपरिक विमानापेक्षा या विमानातून अगदी कमी प्रमाणात कार्बनचा उत्सर्ग होणार आहे. तब्बल ९० टक्के कमी कार्बन हवेत जाणार असल्यामुळे हे विमान पर्यावरणासाठी घातक नाहीये असं कंपनीचं म्हणणं आहे.

या विमानात तरंगू शकणारा हेलियम गॅस. अक्रोडायनॅमिक लिफ्ट तसंच वेक्टर थ्रस्ट यांचं मिश्रण असणार आहे. त्यामुळे यात पारंपरीक विमानापेक्षा कमीतकमी इंधनाची गरज असणार आहे.

Airlander 10 ची वैशिट्य

या विमानाचं केबिन मोठं असणार आहे. या विमानात नॉइज आणि व्हायब्रेशन अगदी कमी असणार आहेत. तसंच इतर विमानांमध्ये होणाऱ्या टर्ब्युलन्स इफेक्टमुळे लोकांना भीती वाटते. मात्र या विमानात टर्ब्युलन्स इफेक्टचा कुठलंच प्रभाव जाणवणार नाहीये.

विमानाचं केबिन जास्त आणि कमी प्रशरमध्येही अगदी सुरक्षित असणार आहे. इतकंच नाही तर अगदी सोसाट्याच्या वाऱ्यात आणि विजांच्या कडकडाटातही विमान अगदी सुरक्षित असणार आहे.आम्ही हायस्पीड ट्रेन्सशी आमची तुलना करणार नाही, मात्र काही मोठी शहरं अगदी काही किलोमीटर्सवर आणण्यात मदत होईल, असं कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

HAV कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे या विमानाची टॉप स्पीड ही १३० किलोमीटर प्रतितास असणार आहे. तसंच काही छोट्या शहरांना जोडण्यासाठी, काही द्वीपसमूहांना जोडण्यासाठी आणि दुर्गम शहरांना जोडण्यासाठी या विमानांचा वापर केला जाऊ शकतो.

कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे सामान्य प्रवासी साडे चार तासांपेक्षा जास्त कुठल्याच पारंपरिक विमानात बसू शकत नाहीत. विमान लँडिंग आणि टेकऑफसाठी विमानतळावर अवलंबून राहावं लागतं. मात्र Airlander 10 मध्ये असं अजिबात नाही. हे विमान कुठल्याही सपाट पृष्ठभागावर लँड होऊ शकतं. इतकंच नाही तर हे विमान पाण्यावरही लँड होऊ शकतं.

या विमानात असणार हायटेक सोयी-सुविधा; फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क
उपराजधानीत पेट्रोलनं गाठली शंभरी; महागाईचाही उडणार भडका

हायब्रीड प्लस इलेकट्रीक बनावटीचं हे विमान २०२५ पर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. तर २०३० पर्यंत या विमानाचं इलेक्ट्रिक व्हर्जन प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

(HAV company will introduce Airlander 10 airship know features)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()