Hawaii Update : हवाईने हेलिकॉप्टरमधून सोडला लाखो मच्छरांचा ताफा; पण कारण जाणून म्हणाल वाह! प्रशासनाचा अनोखा उपक्रम जाणून घ्या

Hawaii Mosquito Release : 'या' पक्षाची प्रजाती वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु,पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हवाई प्रशासनाचा मोठा उपक्रम,
saving hawaii's honeycreepers mosquito release
saving hawaii's honeycreepers mosquito releaseESAKAL

Hawaii : हवाईमध्ये रंगबिरंगी आणि वेगवेगळ्या आकाराच्या चोच असलेले ५० पेक्षा जास्त प्रजातींचे सुंदर हनीक्रीपर पक्षी आढळतात. मात्र, या पक्ष्यांच्या अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हवाईमधील प्रशासन त्यांना वाचवण्यासाठी अनोखा प्रयत्न करत आहे.

आपल्याला वाचून नक्की आश्चर्य वाटेल, पण हवाईमध्ये ते मच्छरांचा वापर करून या पक्ष्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत!

१८००च्या दशकात आलेल्या मच्छरांमुळे झालेला एवियन मलेरिया हा रोग हनीक्रीपर पक्ष्यांसाठी प्राणघातक ठरतो. या रोगाला तोंड देण्याची या स्थानिक पक्ष्यांची कोणतीही प्रतिकारशक्ती नाही. फक्त एका चाव्यामुळे देखील त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

saving hawaii's honeycreepers mosquito release
Loki Dinosaur : सुरीसारखी शिंगे, 5 टन वजन; मार्वलमधील 'लोकी'ची आठवण करून देणाऱ्या डायनोसरच्या नव्या प्रजातीचा शोध

हॅलिकाला राष्ट्रीय उद्यानातील वन पक्षी कार्यक्रम समन्वयक, क्रिस वॉरेन यांनी द गार्डियनला सांगितले, "या पक्ष्यांची जात नष्ट होण्यापुर्वी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले नाहीत तर ते अधिक दुःखदायक ठरेल. प्रयत्न करणे आवश्यक आहे."

त्यासाठी आठवड्यातून एकदा हेलिकॉप्टरद्वारे दहा लाखांहून अधिक नर मच्छरांचा ताफा पाडला जातो. या नर मच्छरांमध्ये व्होलबॅचिया नावाचे जीवाणू असते. हे जीवाणू जणुकात्मक जन्म नियंत्रणाचे काम करते. म्हणजेच या नर मच्छरांमुळे जंगली मादी मच्छरांची अंडी तयार होऊ शकत नाहीत. या पद्धतीला असंगत किटक तंत्र (Incompatible Insect Technique - IIT) असे म्हणतात.

saving hawaii's honeycreepers mosquito release
Aliens On Earth: पृथ्वीवर माणसांप्रमाणेच राहत आहेत 'सिक्रेट' एलियन्स; हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधन कितपत खरे?

हवाईमध्ये गेल्या काही वर्षांत ३३ पेक्षा जास्त हनीक्रीपर प्रजाती लुप्त झाल्या आहेत. तर काही प्रजाती धोकादायक अवस्थेत आहेत. कौआई क्रिपर या पक्ष्यांची संख्या २०१८ मध्ये ४५० होती. मात्र, आज जंगलात फक्त एकच पक्षी उरला आहे. वाढत्या हवामान बदलामुळे मच्छर आता उंचावरच्या प्रदेशातही जात आहेत. त्यामुळे या पक्ष्यांच्या शेवटच्या आश्रयालयालाही धोका निर्माण झाला आहे.

saving hawaii's honeycreepers mosquito release
Spacewalk Viral : ..अन् अंतराळवीर थेट पृथ्वीच्या वर लटकला; चीनच्या यानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल,बघितला काय?

अमेरिकेची राष्ट्रीय उद्यान सेवा, हवाई राज्य आणि मऊई वन पक्षी पुनर्प्राप्ती प्रकल्प यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेची लक्षणे यंदाच्या उन्हाळ्यात दिसण्याची शक्यता आहे. कारण उन्हाळ्यात मच्छरांची संख्या सर्वाधिक असते.

क्वीन्सलँड विद्यापीठातील डॉ. निगेल बीबी यांनी यासारख्या तंत्रांवर संशोधन केले आहे. ते म्हणतात की, जंगल राखण्यासाठी हा पर्यावरणपूरक मार्ग खूप प्रभावी आहे. परंतु, दीर्घकालीन मच्छरनियंत्रण हे अजूनही आव्हानच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com