Hero Electric 2/3 Wheeler : क्षणात दुचाकी अन् क्षणात तीनचाकी.. हीरोने सादर केली अनोखी इलेक्ट्रिक स्कूटर! पाहा व्हिडिओ

या अनोख्या कन्व्हर्टिकल गाडीला हीरोने 'सर्ज' असं नाव दिलं आहे. ही गाडी SURGE S32 या सीरीजचा भाग आहे.
Hero Convertible Electric Scooter
Hero Convertible Electric ScootereSakal
Updated on

Hero Convertible Electric Vehicle Surge : भारतीय ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी हीरोने एक अनोखी इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. ही स्कूटर दुचाकी आणि तीनचाकी गाडीचं कॉम्बिनेशन आहे. ग्राहक आपल्या गरजेनुसार याचा वापर करू शकते, असं हीरोने स्पष्ट केलं आहे.

हर्ष गोएंका यांनी आपल्या एक्स हँडलवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या तीन मिनिटांमध्ये ही गाडी टू-व्हीलरची थ्री-व्हीलर आणि थ्री-व्हीलरची टू-व्हीलर होऊ शकते. या अनोख्या कन्व्हर्टिकल गाडीला हीरोने 'सर्ज' असं नाव दिलं आहे. ही गाडी SURGE S32 या सीरीजचा भाग आहे.

ही केवळ भारतातीलच नाही, तर जगातील पहिली शिफ्टिंग व्हेईकल आहे. याचा खासगी आणि कमर्शिअल वाहन असा दोन्ही प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो. थ्री व्हीलर स्वरुपात असताना यामध्ये मागे सामान वाहतूक देखील करता येऊ शकते. तसंच सामान वाहून नेण्याची गरज नसताना याचा दुचाकीच्या स्वरुपातही वापर केला जाऊ शकतो.

Hero Convertible Electric Scooter
Mahindra XUV400 2024 : महिंद्राने लाँच केली नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही! नेक्सॉनला देणार का शॉक?

फीचर्स

टू-व्हीलर म्हणून वापर करताना यामध्ये 3kW क्षमतेची पॉवर मिळेल, ज्यामुळे याचा टॉप स्पीड 60 Kmph असेल. तर थ्री व्हीलर म्हणून वापरताना यामध्ये 11kWh बॅटरी पॅक असेल, जो 10kW पॉवर जनरेट करेल. याचा टॉप स्पीड 50 Kmph असेल. तसंच यामध्ये 500 किलो वजन वाहून नेता येईल.

किंमत अन् लाँच

ही अनोखी गाडी मार्केटमध्ये कधी उपलब्ध होईल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. तसंच याची किंमत किती असेल याबाबत देखील कंपनीने काहीही स्पष्ट केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.