हिरो मोटोकाॅर्पने (Hero Motocorp) गुरुवारी (ता.आठ) भारतात पाॅवरफुल हिरो एक्स पल्स २०० ४ व्ही मोटारसायकल (Xpulse 200 4V) सादर केली आहे. ही मोटारसायकल १ लाख २८ हजार १५० रुपये (दिल्लीत एक्स शोरुम) आहे. याचे एक स्पेशल रॅली किट व्हर्जनही येते. या मोटारसायकलचे कंपोनेंट्स (साहित्य) सध्या ४६ हजार रुपये जास्तीचे देऊन मिळतायत. हिरो एक्स प्लस २०० ४ व्ही एक्स पल्स रेंज मोटारसायकलींमध्ये चार व्हाॅल्वचे एडिशन आहे. ती नुकतीच भारतीय रस्त्यांवर चाचणी करताना दिसली होती. त्यात नवीन फोर व्हाॅल्व इंजिन, जास्त पाॅवर आणि अधिक टाॅर्क मिळेल. नवीन एक्स पल्स २०० ४ व्ही तीन नवीन रंगात उपलब्ध आहे. ट्रेल ब्लू, ब्लिट्झ ब्लू आणि रेड रेड ही ती रंग. ती १९९.६ सीसी, सिंगल सिलेंडर, ऑईस कुल्ड इंजिन द्वारा चालते. ते स्टँडर्ड एक्स पल्स २०० ला ही पाॅवर देते. एक्स पल्स बीएस-व्हीआय इंजिनने सज्ज आहे. जे ८५०० आरपीएम वर १९.१ पीएस @ चे पाॅवर आऊटपुट आणि १७.३५ एनएम @ ६५०० आरपीएम टाॅर्क निर्माण करते. हे इंजिन पाच स्पीड गिअरबाॅक्ससह एलईडी हेडलाईटबरोबर येते.
या व्यतिरिक्त, ड्युअल पर्पज टायर, १०-स्टेप अॅडजस्टेबल मोनो शाॅक सस्पेंशन, ८२५ मीमीची सीट हाईट आणि २२० मीमीची ग्राऊंड क्लिअरन्स ऑन/ ऑफ रोड रोमांचसाठी एक प्लस पाॅईन्ट मानले जाऊ शकते. असे म्हटले जाऊ शकते की ही मोटारसायकल सर्व प्रकारच्या रस्त्यांसाठी बनवली आहे. माती, खड्डे, दुर्गम किंवा कच्चे रस्ते आणि नाले आदींना ती पार करु शकते. दुसरीकडे मोटारसायकलचा लूकही मड रेसिंगशी काही प्रमाणात मिळते-जुळते. यामुळे मोटारसायकल शौकिनांना ती खूप आवडेल. बाजारात अशाच प्रकारची मोटारसायकल राॅयल एन्फिल्डने आणली होती. तिचे नाव हिमालयन. तिला लांब पल्ल्याबरोबर डोंगराळ भागात चालवण्यास पसंती दिली जायची. मात्र शहरांमध्ये युवा वर्गाने ती वेगळ्या अंदाजासाठी निवडली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.