Offer On Hero Splendor Plus: Hero मोटोकॉर्पच्या स्प्लेंडर या बाईकला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो. १००सीसी इंजिनसह येणारी ही बाईक खूपच कमी किंमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांची देखील खरेदीसाठी रांग लागलेली असते. याशिवाय, जास्त माइलेजमुळे देखील ही बाईक लोकप्रिय आहे. तुम्ही जर Hero Splendor Plus ला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ७६,३४६ रुपयांपर्यंत आहे.
तुम्हाला जर बाईकसाठी ८० हजार रुपये खर्च करायचे नसल्यास सेकंड हँड मॉडेलचा देखील विचार करू शकता. याशिवाय, तुम्ही ईएमआयवरून देखील बाईकला स्वस्तात खरेदी करू शकता. अनेक प्लॅटफॉर्म्सवर Hero Splendor Plus २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे. Hero Splendor Plus च्या सेकंड हँड मॉडेलवर मिळणाऱ्या या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
DROOM वर स्वस्तात उपलब्ध आहे बाईक
Hero Splendor Plus चे जुने मॉडेल DROOM या साइटवर खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. साइटवर २०१४ चे मॉडेल फक्त २५ हजार रुपयात उपलब्ध आहे. या बाईकला खरेदी करण्यासाठी फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध आहे.
QUIKR वरून करा खरेदी
हीरो स्प्लेंडर प्लसचे सेकंड हँड मॉडेल QUIKR वेबसाइटवर खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. साइटवर बाईकचे २०१५ चे मॉडेल उपलब्ध आहे. हे सेकंड हँड मॉडेल फक्त ३० हजार रुपयात उपलब्ध आहे. मात्र, यावर कोणताही फायनान्स प्लॅन मिळत नाही.
OLX वर उपलब्ध आहे सेकंड हँड मॉडेल
सेकंड हँड हीरो स्प्लेड प्लसला OLX वेबसाइटवरून आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करू शकता. साइटवर २०१२ चे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध असून, याची किंमत फक्त २० हजार रुपये आहे. दरम्यान, बाईकचे सेकंड हँड मॉडेल खरेदी करण्याआधी गाडीची कंडिशन आणि कागदपत्रं नक्की तपासा. तसेच, नवीन मॉडेल खरेदी करण्याचा विचार असल्यास डाउन पेमेंट करून बाईकला घरी घेऊन जाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.