Hero Splendor Plus Xtec Bike details: अनेकांना नवीन बाईक खरेदी करायची असते, परंतु किंमतीमुळे टाळाटाळ करत असतात. तुम्ही देखील आतापर्यंत किंमतीमुळे बाईक खरेदी केली नसल्यास काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला खूपच कमी किंमतीत येणाऱ्या लोकप्रिय बाईकबाबत माहिती देणार आहोत.
तुम्ही फक्त ५ हजार रुपये देऊन लोकप्रिय हीरो स्प्लेंडर प्लस एक्सटेकला (Hero Splendor Plus Xtec) खरेदी करू शकता. ही देशातील १०० सीसी सेगमेंटमधील लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. या बाईकमध्ये तुम्हाला शानदार आणि आधुनिक फीचर्ससह दमदार इंजिन मिळेल. याचे माइलेज देखील चांगले आहे.
हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
Hero Splendor Plus Xtec ची किंमत ७३,२०० रुपये आहे. तर ऑन रोड किंमत ८८,०४१ रुपये आहे. तुम्ही या बाईकला स्वस्तात खरेदी करू शकता. यावर फायनान्सची सुविधा देखील उपलब्ध आहे. या फायनान्स प्लॅनचा लाभ घेतल्यास बाईकला फक्त ४,९९९ रुपये देऊन घरी घेऊन जाऊ शकता.
दरमहिना द्या फक्त २ हजार रुपये
हीरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक (Hero Splendor Plus Xtec) बाईक दमदार फीचर्ससह येते. बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून ८५,३९४ रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. तुम्ही फक्त ४,९९९ रुपये डाउन पेमेंट देऊन बाईकला बुक करू शकता. बँकेकडून कर्ज मिळाल्यास तुम्हाला दरमहिन्याला फक्त २ हजार रुपये ईएमआय द्यावी लागेल. हे ईएमआय तुम्हाला ३ वर्ष म्हणजेच ३६ महिने भरावे लागतील.
Hero Splendor Plus Xtec बाईक देते जबरदस्त माइलेज
हीरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक व्हेरिएंटमध्ये कंपनीने एअर कूल्ड टेक्नोलॉजीवर आधारित ओएचसी इंजिन दिले आहे. हे सिंगल सिलेंडर ९७.२ सीसी क्षमतेचे इंजिन ८ पीएसची मॅक्सिमम पॉवर आणि ८.०२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गियरबॉक्ससोबत येते. माइलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, एक लीटर पेट्रोलमध्ये ८० किमीची रेंज मिळेल. या माइलेजला ARAI ने प्रमाणित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.