HMD Global Nokia Brand : मोबाईल कंपन्यांमध्ये काही वर्षांपूर्वी मोठं नाव असणारी कंपनी म्हणजे 'नोकिया'. एकेकाळी मोबाईल म्हटलं की नोकिया असं समीकरणच झालं होतं. मात्र, वेगाने बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या स्पर्धेत टिकून राहणं या कंपनीला शक्य झालं नाही. आधी मायक्रोसॉफ्ट आणि नंतर एचएमडी ग्लोबल या कंपन्यांच्या मदतीने नोकिया बाजारात तग धरून होती. मात्र, आता एचएमडीने देखील नोकियाला मोठा धक्का दिला आहे.
HMD Global या कंपनीने असं म्हटलं आहे, की आता ते HMD या ब्रँडिंगने स्मार्टफोन तयार करणार आहेत. आतापर्यंत HMD केवळ नोकिया या ब्रँडनेमने स्मार्टफोन तयार करत होते. मात्र, आता आपल्या स्वतःच्या नावाने देखील मोबाईल बनवणार असल्याची माहिती या कंपनीने दिली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून एचएमडी ग्लोबल कंपनी आपलं मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करत आहे. एचएमडीने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरून नोकिया ब्रँडला काढून टाकलं होतं. तसंच विविध पोस्टमधून त्या आपल्या नावाचं ब्रँडिंग करत होते.
कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवर असणाऱ्या लिंक्समध्ये पूर्वी नोकिया डॉट कॉम ही वेबसाईट दिलेली होती. मात्र, आता ती बदलून एचएमडी डॉट कॉम अशी झाली आहे. HMD म्हणजे Human Mobile Devices या नावानेच आता ते नवीन मोबाईल तयार करणार आहेत. येत्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या नावाने नवीन स्मार्टफोन लाँच केला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
एचएमडीने सांगितलं आहे, की आपल्या ब्रँडवर फोकस करत असताना ते नोकियाचे फोन बंद करणार नाहीत. HMD सोबतच ते नोकियाचे मोबाईल देखील बनवतील. सोबतच नवीन ब्रँड्ससोबत कोलॅबरेशन करण्यासाठी देखील आपण उत्सुक असल्याचं एचएमडीने म्हटलं आहे. अर्थात नोकियाचे स्मार्टफोन घेण्यासाठी आता यूजर्सना एचएमडीच्या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.