Honda Activa 6G चे स्टँडर्ड व्हेरिएंट कमी किंमतीत करा खरेदी, जाणून घ्या तपशील

देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर
Honda Activa 6 G
Honda Activa 6 Gesakal
Updated on

नवी दिल्ली : दुचाकी सेक्टरच्या स्कूटर सेगमेंट आता बाईकच्या सेगमेंटप्रमाणे मागणी वाढली आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये स्कूटरची मोठी रेंज उपलब्ध आहे. त्यातील होंडा (Honda) अॅक्टिव्हा ६ जी विषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ती देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. होंडा अॅक्टिव्हा '६ जी' चे स्टँडर्ड व्हेरिएंटविषयी (Honda Activa 6 G Standard) बोलाल तर तिची प्रारंभीची किंमत ७० हजार ५९९ रुपये आहे. जर तुमच्याकडे खरेदी करण्यासाठी एवढी मोठी रक्कम नसेल तर ठिक आहे. येथे जाणून घ्या ती सहज डाऊनपेमेंट आणि ईएमआयसह कसे खरेदी करावे. ऑनलाईन डाऊन पेमेंट आणि ईएमआय हिशोबानुसार, जर तुम्ही होंडा अॅक्टिव्हा ६ जीच्या स्टँडर्ड व्हेरिएंट खरेदी करत असाल तर त्यासाठी बँक ७३ हजार ९०७ रुपयांचे कर्ज देईल. (Honda Activa 6 G Standard Variant Buy Down Payment With Eight Thousand)

Honda Activa 6 G
Bajaj Chetak Electric स्कूटरला तरुणाईची पसंती, जाणून घ्या फिचर्स व किंमत

त्यानंतर तुम्हाला ८ हजार रुपयांचे किमान डाऊन पेमेंट द्यावे लागेल आणि नंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला २ हजार ६५० रुपये महिन्याला ईएमआय द्यावे लागेल. होंडा अॅक्टिव्हा ६ जी वर मिळत असणाऱ्या कर्ज चुकवण्याची मुदत ३ वर्ष निर्धारित केले आहे. या कर्जाच्या रक्कमेवर बँक ९.७ टक्के वार्षिक दराने व्याज घेईल. होंडा अॅक्टिव्हा ६ जी वर मिळत असलेल्या डाऊन पेमेंट प्लॅन जाणून घेतल्यानंतर या स्कूटरचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनविषयी तपशील..

होंडा अॅक्टिव्हा ६ जीचे इंजिन आणि पाॅवरबाबत बोलाल तर कंपनीने त्यात १०.५१ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. जे ७.७९ पीएसचे पाॅवर आणि ८.७९ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. स्कूटरचे ब्रेकिंग सिस्टिम म्हणाल, तर कंपनीने तिच्या फ्रंट व्हिल आणि रिअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेकचे काॅम्बिनेशन दिले आहे. त्यासह अलाॅय व्हिल आणि ट्यूबलेस टायरशी जोडले गेले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे, की ही स्कूटर ६० किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देते.

(सूचना - होंडा अॅक्टिव्हा ६ जी वर मिळणारे कर्ज, डाऊन पेमेंट आणि व्याजदरांचे प्लॅन तुमची बँकिंग आणि सिबिल स्कोरवर अवलंबून आहे. त्यात निगेटिव्ह रिपोर्ट झाल्यास बँक आपल्या या तीन घटकांबाबत बदल करु शकते.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.