होंडाने भारतात आपल्या H'ness CB350 आणि CB350RS या गाड्यांचे नवीन एडिशन लाँच केले आहेत. लेगसी आणि ह्यू एडिशन अशी याची नावं आहेत. या दोन्ही गाड्यांची बुकिंग सुरू झाली असून, लवकरच देशभरात डिलिव्हरी होणार आहे.
होंडा सीबी 350 लेगसी एडिशन आणि सीबी 350 आरएस न्यू ह्यू एडिशन या दोन्ही गाड्यांमध्ये कित्येक नवीन फीचर्स दिले आहेत. या दोन्ही गाड्यांमध्ये ऑल-एलईडी लायटिंग सिस्टीम देण्यात आली आहे, ज्यामध्ये गोल एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लॅम्प यांचा समावेश आहे.
यासोबतच नवीन एडिशन्समध्ये होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीम, अॅडव्हान्स डिजिटल-अॅनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर, असिस्ट स्लिपर क्लच, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल सिस्टीम असे फीचर्स देण्यात आले आहेत. (Bike News)
या गाड्यांमध्ये 348.36 CC एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलिंडर BS-6, OBD2 PGM-FI इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 5,500 rpm वर 20.7 bhp आणि 3,000 rpm वर 30Nm टॉर्क जनरेट करतं. दोन्ही गाड्यांमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
Honda CB350 Legacy या गाडीची किंमत 2,16,356 रुपये एवढी आहे. तर, CB350 RS Hue Edition या बाईकची किंमत 2,19,357 रुपये आहे. या दोन्ही दिल्लीमधील एक्स-शोरुम किंमती आहेत. गाड्यांची बुकिंग सुरू झाली असून, लवकरच डिलिव्हरी सुरू होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.