New bike launch - देशातील प्रसिद्ध दुचाकी कंपनी असलेल्या होंडाने आज आपल्या एका बाईकचं अपडेटेड व्हर्जन लाँच केलं. होंडा लिव्हो (Honda Livo) या गाडीला नव्या रिअल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स आणि अपडेटेड इंजिनसह लाँच करण्यात आलं. या गाडीचे दोन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत.
110 CC क्षमतेच्या सेगमेंटमध्ये होंडाची लिव्हो ही गाडी भरपूर लोकप्रिय आहे. याचं नवीन मॉडेल आधीपेक्षा अधिक एडव्हान्स असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामुळे बाईकचा परफॉर्मन्स अधिक चांगला झाल्याचंही कंपनीचे सीईओ त्सुत्सुमू ओटानी यांनी म्हटलं आहे. आम्ही OBD2 मानकांच्या अनुरूप ही गाडी सादर केली आहे, त्यामुळे आमच्यासाठी आज एक मोठा दिवस असल्याचंही ते म्हणाले.
कसं आहे इंजिन?
होंडाच्या या गाडीमध्ये कंपनीने 109 cc क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन OBD2 मानकांनुसार तयार करण्यात आलं आहे. हे इंजिन 8.67bhp पॉवर आणि 9.30 Nm टॉर्क जनरेट करतं.
यामध्ये फ्युएल इंजेक्शन आणि सायलेंट स्टार्ट तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. तसंच प्रोग्राम्ड फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजीमुळे गाडीचा परफॉर्मन्स आणि मायलेज दोन्ही सुधारलं असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या गाडीमध्ये 4-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. या मध्ये 18-इंच अलॉय व्हील्स दिले आहेत. समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग सस्पेन्शन आहे. दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक मिळतात. मात्र, हायर वेरिएंट मध्ये डिस्क ब्रेकचा पर्याय ही देण्यात आली आहे.
अत्याधुनिक फीचर्स
होंडा लिव्होमध्ये इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, डीसी हेडलॅम्प्स, एकत्रित - ब्रेकिंग सिस्टम, ट्यूबलेस टायर्स आणि मागील सस्पेंशनसाठी पाच-स्टेप प्रीलोड ऍडजस्टॅबिलिटी मिळते. या बाइकचा लूक आणि डिझाइन हे बहुतांशी जुन्या मॉडेल प्रमाणेच आहे. मात्र, यात पेट्रोल टँकवर नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
10 वर्षांची वॉरंटी
विशेष म्हणजे या गाडीवर कंपनी तब्बल १० वर्षांची वॉरंटी देत आहे. यामध्ये तीन वर्षांची वॉरंटी आणि सात वर्षांची अतिरिक्त एक्स्टेंडेड वॉरंटी याचा समावेश आहे. बाजारात या बाईकची स्पर्धा प्रामुख्याने टीव्हीएस स्पोर्ट, हीरो स्प्लेंडर, हीरो पॅशन एक्सटेक या गाड्यांसोबत होणार आहे.
किती आहे किंमत?
होंडा लिव्होच्या ड्रम ब्रेक व्हेरियंटची किंमत ७८,५०० रुपये (एक्स शोरुम) आहे. तर डिस्क ब्रेक असणाऱ्या व्हेरियंटची किंमत ८२,५०० रुपये (एक्स शोरुम) एवढी असणार आहे. तीन कलर ऑप्शनमध्ये ही गाडी उपलब्ध असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.