Honor X9b : कंपनीच्या प्रमुखांनी स्वतःच जमिनीवर आपटला फोन.. व्हिडिओ पाहून लोक म्हणतायत 'आता हाच घेणार!'

ऑनर एक्स 9 बी या स्मार्टफोनला कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच या स्मार्टफोनचा टीझर शेअर करण्यात आला होता.
Honor X9b Drop Test
Honor X9b Drop TesteSakal
Updated on

Honor X9b Drop Test : चिनी स्मार्टफोन कंपनी 'ऑनर' ही भारतात पुन्हा एकदा आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी कंपनीने एक मिड रेंज स्मार्टफोन सादर केला होता. आता काही दिवसांमध्येच कंपनी आपला एक तगडा स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँचपूर्वी कंपनीचे भारतातील प्रमुख माधव सेठ यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

काही दिवसांपूर्वी सेठ यांनी Honor X9b या फोनचा टीझर आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला होता. त्यानंतर आता एका नव्या व्हिडिओमध्ये ते स्वतःच आपल्या कंपनीचा नवीन फोन जमिनीवर आपटताना दिसत आहेत.

आपला नवा स्मार्टफोन किती मजबूत आहे, हे दाखवण्यासाठी सेठ हा फोन जमीनीवर आपटून दाखवत आहेत. ऑनर एक्स 9 बी या स्मार्टफोनला कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या उंचीवरून खाली पाडूनही हा डिस्प्ले आजिबात डॅमेज होत नसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Honor X9b Drop Test
POCO X6 Series : 'पोको'ने लाँच केली बहुप्रतिक्षित स्मार्टफोन सीरीज; स्वस्तात मिळतील फ्लॅगशिप फीचर्स

लीक्स

अद्याप या स्मार्टफोनबाबत जास्त अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लीक्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, यात 108MP क्षमतेचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. फोनचा डिस्प्ले 6.78 इंच मोठा OLED असू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेट देईल. तसंच या स्मार्टफोनमध्ये 5,800 mAh क्षमतेची तगडी बॅटरी दिली जाऊ शकते.

ऑनरने चीनमध्ये हा स्मार्टफोन 1,999 युआन या किंमतीला लाँच केला होता. म्हणजेच, भारतात देखील याची किंमत साधारणपणे 20 ते 25 हजार रुपयांच्या आसपास असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.