ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
ज्यांच्याकडे पॅन कार्ड (Pan Card) आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पॅनकार्डधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत आपला परमनंट अकाउंट नंबर (पॅन) आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करावा लागणार आहे. वेळेच्या मर्यादेत असे न केल्यास आपले पॅन कार्ड इनअॅक्टिव्ह (Inactive) होऊ शकते. मुदतीनंतर पॅन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला १ हजार रुपयेही द्यावे लागतील. त्याचबरोबर या दिवसात इनअॅक्टिव्ह पॅन कार्डचा वापर केल्यास त्यास्थितीत 10 हजार रुपयांपर्यंत दंड (Penalty) होऊ शकतो. शिवाय अशी व्यक्ती म्युच्युअल फंड, शेअर्स, बँक खाती उघडणे आणि अशा इतर ठिकाणी जिथे पॅनकार्ड देणे आवश्यक आहे, तेथे गुंतवणूक करू शकणार नाही.
पॅनला आधारशी ऑनलाईन लिंक कसे करावे
- सर्वात आधी इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जा.
- आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक अॅड करा.
- आधार कार्डमध्ये फक्त जन्म वर्ष दिलं असेल तर त्याला क्लिक करा.
- आता कॅप्चा कोड टाका.
- आता लिंक आधार बटणावर क्लिक करा.
- तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.
एसएमएसद्वारे पॅनला आधारशी लिंक करा
तुम्हाला तुमच्या फोनमध्ये यूआयडीपीएन टाइप करणे आवश्यक आहे. त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर 10 अंकी पॅन नंबर टाका. आता स्टेप 1 मध्ये नमूद केलेला मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.
इनअॅक्टिव्ह पॅन कसे अॅक्टिव्ह करावे
- इनअॅक्टिव्ह पॅन कार्ड अॅक्टिव्हेट होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला एसएमएस पाठवावा लागेल.
- तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलमधून 10 अंकी पॅन नंबर टाकावा लागेल. तसेच 567678 किंवा 56161 या क्रमांकावर जा आणि एसएमएस देऊन 12 आकडी आधार क्रमांक टाकावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.