Mobile Hacks: आता मित्रांशी फोनवर बोला फ्री मध्ये, ना इंटरनेट लागणार ना रिचार्ज!

फोन ही एक अशी गोष्ट आहे जी खूप गरजेची आहे, त्यामुळे आपण उगाच पैसे घालवत असतो
Free Phone Calls Mobile Hacks
Free Phone Calls Mobile Hacksesakal
Updated on

Free Phone Calls Mobile Hacks: आजच्या जगात फुकटात काहीही मिळत नाही. अगदी कडीपत्ता घेयचा म्हटला तरी भाजी वाल्या मावशी म्हणतात 10 रुपये द्या. अशात मोबईलच्या रिचार्जचे भाव काहीच्या काही वाढले आहेत. फोन ही एक अशी गोष्ट आहे जी खूप गरजेची आहे, त्यामुळे आपण उगाच पैसे घालवत असतो. त्यातही आजकाल मोबाइल कंपनी आपल्याकडून आधीपासूनच पैसे घेऊन आपल्याला पॅक उपलब्ध करुन देतात आता महिन्याला ठरलेले कॉल्स झालेच नाही तर? अर्धे पैसे पाण्यात.

पण आता असं काहीही होणार नाही कारण आता तुम्ही पैसे न भरता आणि कोणतंही रिचार्ज न करता कोणालाही फोन लावू शकतात. गंमत म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इंटरनेट सुद्धा लागणार नाहीये.

Free Phone Calls Mobile Hacks
Mobile Tips & Tricks : मोबाईल हरवल्यास लगेच असे करा ब्लॉक, कोणालाही वापरता येणार नाही, डिटेल्सही राहील सेफ

जर तुम्हालाही आपले पैसे आणि इंटरनेट खर्च न करता आयुष्यभर फ्री मध्ये सगळ्यांशी कॉल वर बोलायचे असेल तर या स्टेप्स फॉलो करा.

1. गुगल प्ले स्टोअरवर जा.

2. आता सर्च बटणवर क्लिक करुन तिथे ब्लूटूथ वॉकी (Bluetooth walkie) नावाचे अॅप्लिकेशन सर्च करा.

3. आता इंस्टॉल (Install) बटणावर क्लिक करा.

4. अॅप्लिकेशन डाऊनलोड झाले की त्यात योग्य त्या सेटिंग्स करुन घ्या.

5. अॅप उघडा. आता तुम्हाला स्क्रीनवर वाय-फाय आणि रिफ्रेश असे दोन बटण दिसतील.

Free Phone Calls Mobile Hacks
Mobile Calling New Rule: 1 मे पासून इनकमिंग कॉल आणि SMSमध्ये होणार मोठे बदल, TRAI लागू करणार नवीन नियम

6. आता हे अॅप तुम्हाला ज्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी बोलायचे आहे त्याच्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

7. एकदा का हे अॅप्लिकेशन दोन्हीकडे उघडले की तुमच्या फोनवर परत अॅप उघडा आणि वाय-फाय आणि रिफ्रेश बटणावर क्लिक करा.

8. बटणावर क्लिक केल्यावर, तुम्हाला जवळपासच्या सर्व ब्लूटूथ उपकरणांची सूची मिळेल. आता तुम्हाला ज्या मित्राशी बोलायचे आहे त्याच्या ब्लूटूथ डिव्हाइसवर टॅप करा.

9. मित्राचा फोन टॅप करताच रिंग होईल.

10. रिंग वाजल्यानंतर ब्लूटूथ उपकरणाचा रंग लाल होईल आणि कॉल झाल्यावर हिरवा होईल.

Free Phone Calls Mobile Hacks
Mobile Phone : मोबाइलवर असतात पब्लिक टॉयलेटपेक्षा घातक बॅक्टेरिया; त्वचेला पोहोचवतात हानी

तुमच्या सोयीसाठी अॅपमध्ये स्पीकरही देण्यात आला आहे. तुम्ही आपल्या पासून 100 मीटरच्या रेडियस मध्ये हे अॅप वापरु शकतात. लक्षात ठेवा ब्लूटूथचे रेडियस हे देखील 100 मीटर पर्यंतच हे अॅप्लिकेशन वापरु शकतात. म्हणजेच तुम्ही एवढ्याच अंतरावर असणाऱ्या माणसाशी फोनवर बोलू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.