Winter Car Tips : हिवाळ्यात कार चालवताना हीटर वापरल्यामुळे किती कमी होतं मायलेज? जाणून घ्या

हीटरचा कारच्या मायलेजला किती फटका बसतो हे हीटरच्या प्रकारावर अवलंबबून असतं. शिवाय तुमची कार जुनी आहे की नवी, कारचा मेन्टेनन्स कसा आहे या गोष्टींचाही मायलेजवर परिणाम होतो.
Winter Car Tips
Winter Car TipseSakal
Updated on

Car Heater effect on Mileage : हिवाळ्यात कार चालवताना हीटर सुरू करणं तर अगदीच गरजेचं असतं. बाहेर कडाक्याची थंडी असताना, कारमधील वातावरण उबदार ठेवण्यासाठी हीटरचा वापर होतो. मात्र, हीटरचा जास्त वापर केल्यामुळे कारचं मायलेज कमी होतं, हे तुम्हाला माहिती आहे का?

हीटरचा कारच्या मायलेजला किती फटका बसतो हे हीटरच्या प्रकारावर अवलंबबून असतं. शिवाय तुमची कार जुनी आहे की नवी, कारचा मेन्टेनन्स कसा आहे या गोष्टींचाही मायलेजवर परिणाम होतो. या गोष्टी कोणत्या आहेत, आणि त्याने किती प्रमाणात मायलेज कमी होतं.. जाणून घेऊया.

इंजिन लोड

जेव्हा तुम्ही हीटर सुरू करता, तेव्हा कारच्या इंजिनवर अतिरिक्त लोड पडतो. कारमधील हीटर हा आतील हवा गरम करण्यासाठी प्रामुख्याने इंजिनच्या उष्णतेचा वापर करतो. इंजिनवर अतिरिक्त ताण पडल्यामुळे इंधनाचा अधिक वापर होतो.

पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक गाड्यांमध्येही अशाच प्रकारे हीटरचा परिणाम होतो. इलेक्ट्रिक कारमध्ये हीटर चालवल्यास तिची रेंज कमी होते. (Car Heater and Mileage)

Winter Car Tips
Winter Car Tips : हिवाळ्यात कार गरम ठेवण्यासाठी ब्लोअर वापरताय? एक छोटीशी चूकही ठरू शकते जीवघेणी! अशी घ्या खबरदारी

ड्रायव्हिंग कंडिशन

बाहेरचं तापमान किती आहे याचाही परिणाम मायलेजवर होतो. अगदी थंड वातावरणात गाडी चालवत असताना वाढलेली एअर डेन्सिटी आणि थंड झालेलं इंधन यामुळे आधीच गाडीची फ्युएल इफिशिअन्सी कमी होते. यातच हीटर वापरल्यामुळे इंजिनवर आणखी ताण वाढतो. यामुळे कारचं मायलेज 5 ते 10 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक कमी होऊ शकतं.

गाडीची कंडिशन

तुमची गाडी किती जुनी आहे यावर देखील हीटरचा मायलेजवर किती प्रभाव पडतो हे अवलंबून असतं. जुन्या गाड्यांमध्ये फ्युअल इफिशिअन्सी आधीच कमी झालेली असते. मात्र, कारच्या हीटिंग सिस्टीमचं रेग्युलर मेन्टेनन्स केलेलं असेल तर मायलेजवर होणारा प्रभाव कमी करता येऊ शकतो. (Heater effect on car mileage)

Winter Car Tips
Car Tips for Winter : गाडीच्या काचेवर वारंवार येतोय फॉग? 'या' टिप्सचा होईल फायदा

न्यू हीटर सिस्टीम

काही नवीन गाड्यांमध्ये अधिक इफिशिअन्ट हीटिंग सिस्टीम देण्यात आल्या आहेत. यामध्ये कारचा काही भाग हा वेगळ्या प्रणालीद्वारे गरम होतो. त्यामुळे इंजिनवर पडणारा तणाव कमी होतो आणि कारचं मायलेज चांगलं राहतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.