RO मधून कसं होतं पाणी स्वच्छ? डोळे झाकून विश्वास ठेऊ नका, प्रक्रिया जाणून घ्या

आरओ कशा प्रकारे तुमच्या पाण्याला फिल्टर करतं हे तुम्हाला माहिती आहे?
RO Purifier Working
RO Purifier Working eSakal
Updated on

आजकाल जवळपास सर्व घरांमध्ये पाणी फिल्टर करुन घेण्यासाठी RO चा वापर केला जातो. विशेषतः बोअरच्या पाण्यात भरपूर क्षार असतात, त्यामुळे अशा पाण्याला आरओच्या माध्यमातून पिण्यायोग्य बनवण्यात येतं. मात्र, आरओ कशा प्रकारे तुमच्या पाण्याला फिल्टर करतं हे तुम्हाला माहिती आहे?

एका प्युरिफायरमध्ये पाण्याला स्वच्छ करण्यासाठी कित्येक फिल्टर, मेम्बरेन आणि यूव्ही लाईटचा वापर होतो. या तीन टप्प्यांतून पाणी गेल्यानंतर ते पिण्यायोग्य होते. हे तीन टप्पे कसे काम करतात याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

RO Purifier Working
TV Remote : खराब रिमोटला फटके देणं थांबवा! दोन मिनिटात करता येईल नीट, वापरा ही ट्रिक

फिल्टर

एका प्युरिफायरमध्ये साधारणपणे तीन फिल्टर असतात. या फिल्टरच्या माध्यमातून धूळ-दगडांचे छोटे कण बाजूला काढले जातात. हे फिल्टर दर तीन महिन्यांनी स्वच्छ करावेत किंवा बदलून घ्यावेत.

मेब्मरेन

सामान्य फिल्टरसोबतच एका प्युरिफायरमध्ये कित्येक लहान फिल्टर दिलेले असतात. पाण्यातील क्षार बाजूला करण्यासाठी या फिल्टरचा वापर होतो. हा मेब्मरेन तुम्ही एका वर्षापर्यंत वापरू शकता. त्यानंतर मात्र हा लगेच बदलून घ्यावा. मेम्बरेन खराब झाल्यानंतर पाण्याची चव बदलू लागते.

RO Purifier Working
World Milk Day : घरच्या घरी बनवा मिल्क पावडर; महिनाभर नाही होणार खराब

यूव्ही लाईट

यानंतर फिल्टर झालेल्या पाण्यावर यूव्ही लाईटचा मारा केला जातो. तुम्हाला कदाचित माहिती असेल की यूव्ही लाईट आपल्या शरीरासाठी घातक असते. मात्र, हे तेव्हाच जेव्हा ती थेट आपल्या शरीरावर पडते. यूव्ही लाईटचा पाण्यात मारा करण्यासाठी प्युरिफायरमध्ये विशेष चेंबर बनवण्यात आलेला असतो.

यूव्ही लाईटमुळे पाण्यातील हानीकारक बॅक्टेरियांचा खात्माा होतो. त्यामुळे पाणी पिण्यायोग्य बनते. तुमच्या प्युरिफायरमध्ये यूव्ही लाईट सुरू आहे की नाही हे दर्शवणारी एक लाईट असते. ही लाईट सुरू आहे, तोपर्यंत यूव्ही रेज आपलं काम करत आहेत हे समजून घ्या.

RO Purifier Working
Tech Knowledge: तुमचे वायफाय राउटर रात्रभर चालू असते का? आरोग्यासाठी आहे खूप हानिकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.