India Vs Australia Final : रविवारी, म्हणजेच उद्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना पार पडणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन तगड्या टीम्समध्ये ही मॅच होणार आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्क्रीनसमोर बसून या सामन्याची मजा लुटण्यासाठी जगभरातील क्रिकेट फॅन्स सज्ज झाले आहेत.
डिज्नी+हॉटस्टार मोबाईलवर यावर्षीच्या वर्ल्डकपचे मोफत स्ट्रीमिंग होत आहे. यामुळेच गेल्या कित्येक सामन्यांमध्ये या प्लॅटफॉर्मने व्ह्यूवरशिपचा रेकॉर्ड मोडला आहे. भारत-न्यूझीलंड सेमी-फायनल सामना तर तब्बल 5 कोटी लोकांनी ऑनलाईन पाहिला होता.
तुम्हीदेखील ऑनलाईन हा सामना पाहणार असाल, तर मध्येच डेटा संपल्यास तुम्हाला एका ऐतिहासिक मॅचला मुकावं लागू शकतं. यामुळेच संपूर्ण मॅच पाहण्यासाठी साधारणपणे किती डेटाची गरज आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. (Data needed for Cricket Match Streaming)
ज्यांच्या घरी अनलिमिटेड वायफाय आहे, त्यांना ही चिंता सतावणार नाही. मात्र, ज्यांचा दिवसाचा 1.5 GB किंवा 2 GB क्षमतेचा डेटापॅक आहे त्यांना मात्र हा डेटा पुरणार नाही. अगदी तुम्ही सर्वात लो क्वालिटी सेटिंगवर मॅच पाहण्याचा विचार केला, तरीही हा डेटा संपूर्ण मॅच पाहण्यासाठी पुरेसा नाही.
वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म हे वेगवेगळ्या प्रमाणात डेटा कंझ्यूम करतात. सध्या आपण केवळ डिज्नी+हॉटस्टारचा विचार करणार आहोत. याठिकाणी जर तुम्ही फुल HD (1080p) क्षमतेने व्हिडिओ पाहत असाल, तर एका तासाला 1.3 GB डेटाची गरज भासते. 720p सेटिंगवर एका तासाला 639 MB एवढा डेटा कंझ्यूम होतो. तर, 360p व्हिडिओ सेटिंगवर एका तासाला सुमारे 249 MB डेटाची गरज भासते. (Disney+Hotstar Data Consumption)
वनडे क्रिकेट मॅच ही साधारणपणे 9 तास चालते. त्यामुळे, तुम्ही सगळ्यात कमी क्वालिटीमध्ये जरी संपूर्ण मॅच पाहिली, तरीही तुमचा दिवसाचा 2GB डेटा पॅक पुरेसा नसणार आहे. फुल एचडीमध्ये (1080p) हा संपूर्ण सामना पहायचा असेल, तर तुमच्याकडे साधारणपणे 12 GB डेटा असणं गरजेचं आहे. (Tech News)
तुमच्याकडे एअरटेलचं सिमकार्ड असेल, तर 118 रुपयांना 12 GB डेटा देणारा बूस्टर पॅक तुम्ही घेऊ शकता. याची व्हॅलिडिटी तुमच्या सध्याच्या प्लॅनएवढीच असणार आहे. त्यामुळे 12GB मधील शिल्लक राहिलेला डेटा तुम्ही नंतरही वापरू शकता. (Airtel Data Booster Pack)
एअरटेलने काही वर्ल्डकप पॅक्स देखील लाँच केले आहेत. यामध्ये 99 रुपयांचा एक अनलिमिटेड डेटा पॅक आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेट अनलिमिटेड मिळेल, मात्र याची वैधता केवळ दोन दिवस असणार आहे. अंतिम सामन्यासाठी हा पॅकही उत्तम आहे.
जिओच्या 12 GB डेटा पॅकची किंमत 121 रुपये आहे. याची वैधता तुमच्या करंट पॅकएवढी असणार आहे. व्होडाफोन-आयडिया, म्हणजेच व्ही कंपनीचा 12GB डेटा पॅक हा 118 रुपयांना आहे. याची व्हॅलिडिटी 28 दिवस असणार आहे. (Data Add on Packs)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.