AC Electricity Consumption : रात्रभर एसी सुरू ठेवला तर किती येईल बिल? जाणून घ्या टनानुसार गणित

एसीचं बिल किती येईल हे त्याच्या वजनावर आणि किती तास वापरला जातो त्यावर अवलंबून असतं. आजकाल बहुतांश एसी स्मार्ट इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी असणारे असतात.
AC Electricity Consumption
AC Electricity ConsumptioneSakal
Updated on

AC Bill in Summer : उन्हाळा सुरू झाल्यामुळे घरा-घरांमध्ये फॅन-एसीचा वापर सुरू झाला आहे. मात्र, एसीच्या वापरामध्ये सगळ्यात जास्त टेन्शन हे लाईट बिलाचं येतं. त्यामुळेच कित्येक जण केवळ काही तासांसाठीच एसीचा वापर करतात, आणि रात्रभर एसी वापरणं टाळतात. मात्र, एसीमुळे नेमकी किती वीज वापरली जाते?

एसीचं बिल किती येईल हे त्याच्या वजनावर आणि किती तास वापरला जातो त्यावर अवलंबून असतं. आजकाल बहुतांश एसी स्मार्ट इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी असणारे असतात. त्यामुळे जुन्या एसींच्या तुलनेत त्यांचं बिल कमी येतं. यामागचं नेमकं गणित काय असतं? जाणून घेऊया.. (Electricity Consumption of AC)

समजा तुमच्याकडे 1.5 टन वजनाचा स्मार्ट एसी आहे, आणि तुम्ही दररोज 8 तास वापर करत असाल; तर त्याचा वीजेचा वापर हा सलग 8 तास एकसारखा नसतो. स्मार्ट इन्व्हर्टर एसीमध्ये पहिल्या तासामध्ये सुमारे 700W वीजेचा वापर करतो. त्यानंतरचे 4 तास हा एसी 500W वीज वापरेल, आणि त्यानंतरचे तीन तास 200W वीज वापरेल. अर्थात, बाहेरचं तापमान किती आहे याचाही त्यावर परिणाम होईलच. संपूर्ण 8 तास बाहेरचं तापमान सारखंच आहे असं गृहित धरुन वरील कॅल्क्युलेशन केलं आहे. (AC Electricity Bill)

AC Electricity Consumption
Fan Speed : उन्हाळ्यात तुमच्याही फॅनचा स्पीड कमी होतो का? जाणून घ्या कारण, अन् दुरूस्त करायची पद्धत

एकूणच, 1.5 टन वजनाचा स्मार्ट एसी जर आठ तास चालला; तर तो एकूण 3.3 ते 4 युनिट वीजेचा वापर करतो. राउंड फिगर केली, तर रात्रभर एसी सुरू ठेवल्यास सुमारे 5 युनिट विजेचा वापर केला जाईल. अर्थात, हा आकडा केवळ नव्या स्मार्ट इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी असणाऱ्या एसींनाच लागू होतो. जुने एसी हे सुमारे 2,000 ते 2,500W वीजेचा वापर करू शकतात. त्यामुळे 8 तासांमध्येच तब्बल 20 युनिट वीज वापरली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.