YouTube : महिन्याला 15 हजार मिळवायचे असल्यास YouTube वर किती सबस्क्रायबर असायला हवेत?

युट्यूबवरून कमाई करण्यासाठी तुमचे सबस्क्रायबर किती असायला हवे ते जाणून घेणं फार आवश्यक आहे.
YouTube
YouTubeesakal
Updated on

YouTube Earning : गुगलनंतर यूट्यूब ही जगात दुसऱ्या नंबरची सगळ्यात जास्त बघितली जाणारी साइट आहे. भारतात अनेकजण युट्यूब वापरतात. युट्यूब व्हिडिओ अपलोड करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

तरुणपिढी सध्या युट्यूबवरून पैसे कमावण्यावर फोकस ठेवून दिसते. मात्र तुम्ही या प्रयत्नात नवीन असाल तर युट्यूबवरून कमाई करण्यासाठी तुमचे सबस्क्रायबर किती असायला हवे ते जाणून घेणं फार आवश्यक आहे.

YouTube वर पैसे मिळायला सुरुवात होण्यासाठी तुमच्या चॅनेलवर Monetization सुरु होणं गरजेचं आहे. ते सुरु होण्यासाठी तुमच्या चॅनेलवर कमीत कमी 1 हजार सब्सक्राइबर्स (Subscribers) आणि 4 हजार Public Hour Views असावे लागतात. यानंतरच गूगल तुम्हाला जाहीरातीद्वारे पैसे देण्यास सुरुवात करतो.

YouTube तुमच्या चॅनेलला 1 हजार सब्सक्राइबर्स आणि 4 हजार Public Hour Views मिळाले आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला YouTube Studio ची मदत होते. तुम्ही तुमच्या अकाऊंटमधून ब्राउझरद्वारे किंवा अॅप डाउनलोड करून ही माहिती एक्सेस करु शकता.

हे फिचर सुरू झाल्यानंतर तुम्हाला एका व्हिडिओला किती व्ह्यूज मिळताय यावरून पैसे मिळायला सुरूवात होते. तुम्हाला जेवढे जास्त व्ह्यूज मिळतील तेवढे तुमची इनकम त्यातून होईल. त्यानंतर तुमचे सबस्क्रायबर किती आहेत ते महत्वाचं ठरत नाही.

तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज असेल आणि त्यात गूगलद्वारे जाहीरात दिली जात असेल तर तुमच्या अकाऊंटला पैसे जमा व्हायला सुरूवात होते. मात्र त्यासाठी तुम्हाला चांगला कंटेंट द्यावा लागेल. म्हणजे जर सातत्याने तुम्ही चांगला कंटेंट देत असाल तर तुम्हाला महिन्याला १५ हजार हमखास कमवू शकता. मात्र त्यासाठी तुमच्या व्हिडिओमध्ये क्रिएटीव्हीटी असायला हवी.

YouTube
YouTube: युट्यूबचा Pornhub ला दणका, केली मोठी कारवाई

याशिवाय युट्यूबवर पैसे कमवण्याचे आणखी काही पर्याय आहेत. तुमच्या चॅनलची मेंबरशीप ऑफर, सुपर चॅट्स, सुपर स्टिकर्स आणि युट्यूब प्रीमिअम द्वारेही पैसे कमावले जाऊ शकतात. तुमच्या व्हिडिओला जर जास्त व्ह्यूज मिळत असतील. तुम्हाला काही कंपन्या जाहिराती देखील देतात. हे एक इनकमचं उत्तम उदाहरण ठरू शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()