Job Scam : ऑनलाईन जॉब स्कॅममधून कशी होते फसवणूक? गृह मंत्रालयाने दिली सविस्तर माहिती..

Home Ministry on Cyber Crime : हॅकर्स आपल्या वेबसाईट्सवर घरबसल्या काम उपलब्ध करून देण्याचं आमिष देत.
Job Scam
Job ScameSakal
Updated on

Home Ministry Bans Job Scam Websites : केंद्रीय गृह मंत्रालयाने आज माहिती दिली, की भारत सरकारने नोकरीसंदर्भात फसवणूक करणाऱ्या 100 वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. सोशल मीडिया, टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर माध्यमातून या वेबसाईट्स फसणूक करत होत्या असं मंत्रालयाने स्पष्ट केलं.

या वेबसाईट्सच्या माध्यमातून नागरिकांची कशी फसवणूक होत होती याबाबत गृह मंत्रालयाने सविस्तर माहिती दिली आहे. गुगल किंवा मेटा अशा प्लॅटफॉर्मचा वापर करुन हे हॅकर्स गरजू नागरिकांना हेरत होते. 'Ghar Baithe Job', 'Ghar Biathe kamai kaise karen' अशा प्रकारचे कीवर्ड्स वापरुन कित्येक लोक नोकरी शोधतात. हेच लक्षात घेऊन, त्या दृष्टीने हे हॅकर्स आपल्या जाहिराती तयार करत होते.

छोट्या कामांचं आमिष

हॅकर्स आपल्या वेबसाईट्सवर घरबसल्या काम उपलब्ध करून देण्याचं आमिष देत. निवृत्त कर्मचारी, गृहिणी आणि बेरोजगार तरुण यांना ते लक्ष्य करत. व्हिडिओ लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा किंवा मग इन्स्टाग्राम पोस्ट लाईक करा अशी सोपी कामं सांगून लाखो रुपये मिळवण्याचं आमिष ते लोकांना देत.

Job Scam
Cyber Crime: सरकारची मोठी कारवाई! गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 100हून अधिक साइटवर घातली बंदी

सुरुवातीला या लोकांना छोटे छोटे टास्क पूर्ण करण्याची पेमेंट म्हणून काही पैसे मिळत. मात्र, त्यानंतर अधिक पैसे मिळवण्यासाठी ते नागरिकांना अधिक पैसे गुंतवण्यास सांगत. नागरिकांनी पैसे गुंतवले की त्यांचा या वेबसाईट किंवा अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस काढून घेतला जात असे. यानंतर लोकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येत होतं. (Tech News)

असं रहा सुरक्षित

ऑनलाईन स्कॅमला बळी पडायचं नसेल तर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

  • यूट्यूब व्हिडिओ किंवा इन्स्टाग्राम पोस्ट लाईक करणे ही नोकरी नसते. यासाठी कोणी पैसे देत नाही हे लक्षात घ्या.

  • व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस किंवा इतर ठिकाणी आलेल्या अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

  • अशा प्रकारचे हॅकर्स शक्यतो विदेशी खोट्या नावांनी मेसेज करतात. अनोळखी नावांनी आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.

  • कोणत्याही प्रकारे फसवणूक झाल्यास किंवा तसा संशय आल्यास नॅशनल सायबरक्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) या वेबसाईटवर तक्रार नोंदवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.