How to Apply for Online Ration Card : आजच्या तारखेत शिधापत्रिका केवळ स्वस्त रेशन मिळवण्यासाठी वापरली जात नाही, तर ते ओळखपत्र म्हणूनही काम करतो. One Nation One Ration Card या योजनेबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे मात्र आता केंद्र सरकारने ही योजना लागू करण्याची अंतिम तारीख 30 जून 2030 निश्चित केली आहे. या दिवसापासून देशातील प्रत्येक नागरिकाकडे रेशन कार्ड असेल आणि ते कोणत्याही भागातून कुठूनही रेशन घेऊ शकतील. ही योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला लेखी पत्रही पाठवले आहे. ते फक्त रेशन कार्डच नसून ते ओळखपत्रही असेल. त्यामुळे आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅनकार्डप्रमाणेच (PAN Card) एखाद्या व्यक्तीसाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आणि महत्त्वाचे ठरणार आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
जर तुम्हाला रेशनकार्डसाठी अर्ज करायचा असेल तर तो कसा करावा ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच रेशन कार्डसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे हेही पाहणार आहोत.
रेशन कार्ड हे तीन प्रकारचे असतात..
दारिद्र्य रेषेवरील (APL)
दारिद्र्यरेषेखालील (BPL)
अंत्योदय अन्न योजना (AAY)
हे कार्ड कोणाला मिळू शकते:
भारतीय नागरिक
इतर कोणत्याही राज्याचे रेशन कार्ड नसावे
18 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही राहता त्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला Apply online for ration card वर क्लिक करावे लागेल.
मग तुम्हाला आयडी प्रूफ द्यावा लागेल जो आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी काहीही असू शकतो.
त्यानंतर तुम्हाला फी भरावी लागेल आणि अर्ज सबमिट करावा लागेल.
यानंतर तुमची फील्ड व्हेरिफिकेशन होईल. ते केल्यावर तुमचे रेशन कार्ड तयार होईल.
फी किती लागेल
रेशन कार्ड बनवण्याची फी प्रत्येक राज्यासाठी वेगळी असते. काही ठिकाणी ही फी 5 रुपयांपासून सुरू होते आणि 45 रुपयांपर्यंत जाते.
फॉर्ममध्ये भरल्यानंतर अर्जात दिलेल्या माहितीची पडताळणी अधिकाऱ्यांमार्फत केली जाते. साधारणपणे हे व्हेरिफिकेशन अर्ज केल्यानंतर 30 दिवसांच्या आत पूर्ण होते. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते. सर्व तपशीलांची पडताळणी केल्यानंतर रेशन कार्ड तयार होते. तसेच कोणताही माहिती चुकीचा आढळल्यास अर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्याच्या तरतुदी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.