How to Become Astronaut : कल्पना चावलाप्रमाणे अंतराळवीर व्हायचंय? दहावीनंतर असे निवडा योग्य कोर्स..

आपल्या 40 वर्षांच्या आयुष्यात कल्पना यांनी दोन वेळा अंतराळ यात्रा केली. त्यांनी केलेल्या कार्यामुळे भारतातील कित्येक पिढ्यांमधील मुला-मुलींना अंतराळवीर होण्याची प्रेरणा मिळाली.
Kalpana Chawla
Kalpana ChawlaeSakal
Updated on

Kalpana Chawla Death Anniversary : कल्पना चावला हे नाव जवळपास प्रत्येक भारतीय व्यक्तीला माहिती आहे. अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर म्हणून त्या ओळखल्या जातात. 1 फेब्रुवारी 2003 रोजी नासाचं कोलंबिया स्पेस शटल पृथ्वीवर परत येत असताना त्याचा दुर्दैवी विस्फोट झाला. यामध्ये कल्पना चावला यांच्यासह इतर अंतराळवीरांचाही मृत्यू झाला.

आपल्या 40 वर्षांच्या आयुष्यात कल्पना यांनी दोन वेळा अंतराळ यात्रा केली. त्यांचं आयुष्य लहान असलं, तरी त्यांनी केलेल्या कार्यामुळे भारतातील कित्येक पिढ्यांमधील मुला-मुलींना अंतराळवीर होण्याची अन् अवकाश संशोधनाची प्रेरणा मिळाली. तुम्हालाही अंतराळवीर व्हायचं असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कसं व्हायचं अंतराळवीर?

अंतराळवीर होण्यासाठी तुम्हाला दहावीच्या आधीपासूनच अभ्यास करावा लागणार आहे. कारण अकरावी-बारावीला तुम्हाला विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा लागेल. तुम्ही गणित विषयातून बारावी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. यानंतर अंतराळवीर होण्यासाठी तुम्हाला विविध पर्याय उपलब्ध आहेत.

बारावीनंतर तुम्हाला इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा गणितात बॅचलर डिग्री यांपैकी एखादा कोर्स करणं गरजेचं आहे. याशिवाय डॉक्टरेट किंवा इंजिनिअरिंगची मास्टर्स डिग्री असणंही गरजेचं आहे. (How to become an astronaut)

Kalpana Chawla
Gaganyaan Mission : अंतराळवीर 3 दिवस राहणार अंतराळात जाणून घ्या काय वेगळं आहे इस्रोच्या गगनयान मोहीमेत

कोणते असतात कोर्स

यानंतर अंतराळवीर होण्यासाठी तुम्हाला Aeronautico, Astrophysics, Aviation aerospace किंवा Aeronautical engineering यांपैकी एक कोर्स करावा लागेल. हे कोर्स तुम्ही आयआयटी कानपूर, मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी तिरुवअनंतपूरम किंवा अन्ना युनिवर्सिटीमधून करू शकता. (Courses needed to become astronaut)

याव्यतिरिक्त तुम्ही वायुसेनेच्या माध्यमातून देखील अंतराळवीर होऊ शकता. सध्या गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेले अंतराळवीर हे वायुसेनेतील पायलट आहेत. (ISRO Gaganyaan Mission)

किती मिळतो पगार?

अंतराळवीरांना सुरुवातीला सुमारे दहा ते बारा लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. पुढे जाऊन हा आकडा 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. इलॉन मस्कच्या स्पेस-एक्स कंपनीत तर अंतराळवीरांना एक कोटी रुपयांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो. (Astronaut Salary)

Kalpana Chawla
ISRO 2024 Missions : पुढचं वर्षही गाजवणार 'इस्रो'; पहिल्या दिवसापासूनच होणार मोहिमांची सुरुवात! पाहा संपूर्ण यादी

निवड प्रक्रिया

  • इस्रोचे अंतराळवीर होण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक हवे.

  • इंग्रजी भाषेवर तुमचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. दुसरी एखादी परदेशी भाषा येत असल्यास अधिक फायदा मिळेल.

  • तुमची उंची 5.2 फूट ते 6.2 फूट असणं गरजेचं आहे.

  • तुमचं वय 26 ते 46 दरम्यान असणं गरजेचं आहे.

  • अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षणात सर्व प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्यामुळे तुम्हाला उत्तमरित्या पोहायला येणं गरजेचं आहे.

  • सिलेक्शन झाल्यानंतर जवळपास दोन वर्षे तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येतं.

  • यामध्ये अंतराळयान चालवणे, अंतराळ यानात काम करणे तसेच अन्य गोष्टींचा समावेश असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.