Fake Facebook Account तुम्हालाही करता येईल ब्लॉक!

काही अकाउंटवरून फेक मेसेज अथवा फोटो व्हायरल करण्याचेही प्रकार समोर आले.
How to Block a fake Facebook Account
How to Block a fake Facebook Account esakal
Updated on
Summary

काही अकाउंटवरून फेक मेसेज अथवा फोटो व्हायरल करण्याचेही प्रकार समोर आले.

सोलापूर : बनावट फेसबुक खाते (Fake Facebook Account) तयार करून फ्रेंड लिस्टमधील काही मित्रांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केली जाते. काही अकाउंटवरून फेक मेसेज अथवा फोटो व्हायरल करण्याचेही प्रकार समोर आले. त्यानंतर सोलापूर शहर व ग्रामीणमधील सायबर पोलिसांनी संबंधितांच्या तक्रारींवरून 2021-22 मध्ये तब्बल 313 बनावट फेसबुक खाती बंद केली आहेत. त्यात शहरातील 53 तर ग्रामीणमधील जवळपास 270 बनावट खात्यांचा समावेश आहे. इन्स्टाग्रामचीही बनावट खाती मोठ्या प्रमाणावर बंद केली आहेत. (How to Block a fake Facebook Account)

How to Block a fake Facebook Account
फेसबुक प्रोफाइल अशी करा लॉक

एखाद्या व्यक्‍तीच्या नावाने फेसबुक (Facebook) अकाउंट तयार करून समोरील व्यक्‍ती मी अडचणीत आहे, माझ्या मुलाला, वडिलांना, आईला दवाखान्यात दाखल केले असून अर्जंट पैसे हवे आहेत, प्लिज या लिंकवर पैसे पाठवा, असा मेसेज पाठवितो. ज्याचे बनावट खाते तयार केले आहे, त्याची फ्रेंड लिस्ट पाहून त्यातील काहींना तसा मेसेज पाठविला जातो. आपल्या मित्राला पैसे हवे आहेत म्हणून काहीजण त्या बनावट मेसेजला फसतात. काही महिन्यांपूर्वी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejasvi Satpute) व एका न्यायाधीशांच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करून पैसे मागण्याचा प्रकार झाला होता. पोलिसांकडूनही तसे अकाउंट बंद होतात.

How to Block a fake Facebook Account
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप युजर्ससाठी अलर्ट! वेळीच व्हा सावध..

अशी आहे ब्लॉक सिस्टीम

तरीही, असा प्रकार कोणाच्या बाबतीत झाल्यास त्याने त्याच्या फ्रेंड लिस्टमधील किमान 20-21 मित्रांना सांगून त्यांच्याकडून संबंधित बनावट खाते क्‍लोज करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. फेसबुकच्या प्रोफाईलवरुन रिपोर्ट हा पर्याय क्‍लिक करावा. त्यानंतर तीन डॉट येतात, त्यावर क्‍लिक करून रिपोर्ट हा पर्याय निवडावा. त्यावेळी तिथे प्रिएंडींग टू समवन हा पर्याय निवडून पुढे मित्राचे खाते बंद करायचे असल्यास तेथील "रेंड' या पर्यायावर क्‍लिक करावे. "स्वत:चे खाते बंद करण्यासाठी' हा पर्याय निवडावा किंवा त्रयस्थ व्यक्‍ती असल्यास "समवन एल्स'वर क्‍लिक करावे. शेवटी सबमिटवर क्‍लिक केल्यास ते खाते बंद होऊ शकते, असेही सायबर पोलिसांनी स्पष्ट केले.

फेसबुक खाते असलेल्या व्यक्‍तींच्या परस्पर त्याच्या नावे बनावट अकाउंट उघडून इतरांना पैशांची मागणी केल्याच्या व बनावट फेसबुक खाते उघडल्याच्या तक्रारींवरून ग्रामीण पोलिसांनी एका वर्षात जवळपास अडीचशे बनावट खाती बंद केली आहेत.

- सूरज निंबाळकर, पोलिस उपनिरीक्षक, सायबर सेल, सोलापूर ग्रामीण

How to Block a fake Facebook Account
फेसबुक मेसेंजरवर करा 'बिल स्प्लिट'; एका क्लिकवर होईल पेमेंट

सायबर पोलिस म्हणतात, जरा इकडे लक्ष द्या...

- बनावट फेसबुक खाते तयार करून पैसे मागितल्याचा प्रकार झाल्यास पोलिसांकडे लेखी तक्रार करावी

- फेसबुकच्या प्रोफाईलवर जाऊन रिपोर्ट, प्रिएंडिंग टू समवनला क्‍लिक करा आणि समवन एल्स, मी अथवा फ्रेंड या पर्यायातून ते खाते बंद करा

- नागरिकांनी शक्‍यतो त्यांच्या फेसबुक खात्यावरील प्रोफाइल फोटो, कव्हर फोटो लॉक करावा

- फेसबुक खात्यावर दिलेली स्वत:ची माहितीदेखील लॉक करावी

- आपल्या फेसबुकवरील सर्व मित्रांची लिस्ट लॉक करता येईल; जेणेकरून बनावट खाते तयार होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()