Spam Calls : वारंवार येतायत स्पॅम कॉल्स? थेट सरकारकडे करता येईल तक्रार; जाणून घ्या प्रक्रिया

Block Spam Calls : तुम्हाला जर भारतीय क्रमांकावरुन मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्स येत असतील, तर संचार साथी या पोर्टलवर जाऊन तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता.
International Spam Calls
International Spam CallseSakal
Updated on

International Spam Calls : गेल्या काही दिवसांपासून भारतातील नागरिकांना येणाऱ्या स्पॅम कॉल्समध्ये वाढ झाली आहे. याबाबत आता केंद्र सरकारनेच नागरिकांना एक इशाराही दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येणारे फोन घेताना खबरदारी घ्यावी असा सल्ला सरकारच्या दूरसंचार विभागाने दिला आहे.

सरकारने एका प्रेस रिलीजमधून सर्व दूरसंचार कंपन्यांना (Telecom Companies) देखील याबाबत निर्देश दिले आहेत. विदेशातून येणाऱ्या स्पॅम कॉल्सना ब्लॉक करण्यास कंपन्यांना सांगण्यात आलं आहे. तसंच नागरिकांनी देखील असे कॉल (Spam Calls) वारंवार येत असल्यास तातडीने तक्रार दाखल करावी असंही यात म्हटलं आहे.

सरकारचा इशारा

भारतीय शेअर बाजाराबाबत चुकीची माहिती पसरवणारे कित्येक स्पॅम कॉल्स नागरिकांना येत आहेत. यासोबतच नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी काही राष्ट्र-विरोधी तत्वे असे कॉल्स करत असल्याचंही मंत्रालयाने म्हटलं आहे. (Fraud Calls)

International Spam Calls
Google Spam Mails : स्पॅम ई-मेल्सना बसणार आळा, गुगल घेणार एआयची मदत! काय आहे नवी योजना?

कुठे करता येईल तक्रार?

तुम्हाला जर भारतीय क्रमांकावरुन मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्स (How to report spam calls) येत असतील, तर संचार साथी या पोर्टलवर जाऊन तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता. यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल -

  • संचार साथी वेबसाईटवर गेल्यास 'रिपोर्ट इंटरनॅशनल कॉल' हा पर्याय निवडा.

  • यानंतर तुम्हाला ज्या मोबाईल नंबरवर कॉल आला होता तो एंटर करा.

  • यानंतर तुम्हाला ज्या नंबरवरुन कॉल येत आहेत तो नंबर एंटर करा.

  • यानंतर कॉलची तारीख आणि वेळ एंटर करा.

  • त्यानंतर ज्या देशातून फोन आला होता त्या देशाचं नाव एंटर करा. (हे अनिवार्य नाही.)

  • यानंतर या कॉलबाबत इतर माहिती देऊन ओटीपी व्हेरिफिकेशन कम्प्लीट करा.

International Spam Calls
Deepfake Scam : मित्राचं रुप घेऊन केला व्हिडिओ कॉल, डीपफेकच्या मदतीने हजारोंचा गंडा! कशी झाली फसवणूक?

अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदवली जाईल. यासोबतच तुम्ही या पोर्टलवरुन आंतरराष्ट्रीय क्रमांकाबाबत देखील तक्रार नोंदवू शकाल.

  • याव्यतिरिक्त तुम्ही आपल्या नेटवर्क प्रोव्हाईडरकडे देखील तक्रार करू शकता. तसंच, नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवरही तक्रार करता येईल. (Block Spam Calls)

  • याव्यतिरिक्त, 1930 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करूनही तक्रार दाखल करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.