Tech Tips : रोजच्या धावपळीत अचानक एखाद्या ठिकाणी जायचे झाले तर रेल्वेचा प्रवास खूप सोयीचा असतो. पण स्थानकावर जाऊन तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहायला वेळ लागतो. यामुळे अनेकदा गाडीही चुकते. अशा वेळी तुमच्या मदतीसाठी असते UTS ॲप.
हे ॲप वापरून तुम्ही तुमचे स्थानिक रेल्वेचे तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट तुमच्या मोबाइल फोनवरून सेकंदातच काढू शकतात. हे ॲप विशेषत: रोजच्या प्रवासासाठी उपयुक्त आहे.
UTS म्हणजे Unreserved Ticketing System. हे ॲप भारतीय रेल्वेच्या CRIS या उपकंपनीने २०१४ मध्ये सुरू केले. या ॲपद्वारे तुम्ही तुमची स्थानिक रेल्वेचे तिकीट काढू शकता, तिकीट रद्द करू शकता किंवा रिन्यू देखील करू शकता आणि प्लॅटफॉर्म तिकीटही काढू शकता. यामुळे तुम्हाला स्थानकावर जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध : हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये UTS ॲप उपलब्ध आहे.
कॅशलेस व्यवहार : UTS ॲपवर तुम्ही R-Wallet, Paytm, UPI इत्यादी माध्यमांद्वारे cashless पेमेंट करू शकता.
कॉन्टॅक्टलेस तिकीट बुकिंग : तुम्हाला थेट स्थानकावर जाऊन तिकीट काढण्याची गरज नाही.
पेपरलेस / पेपर तिकीट : तुम्ही तुमचे तिकीट पेपरलेस स्वरूपात ठेवू शकता किंवा स्थानकावरच्या मशीनवरून पेपर तिकीट काढू शकता.
पुढच्या येणाऱ्या गाड्यांची माहिती : तुमच्या सोयीनुसार पुढच्या येणाऱ्या गाड्यांची माहिती तुम्ही या ॲपवर पाहू शकता.
Play Store किंवा Apple iOS वर UTS ॲप डाउनलोड करा.
तुमचा मोबाईल नंबर, नाव, लिंग आणि जन्मदिनांक टाकून रजिस्टर करा.
तुमचे स्वतःचे password तयार करा.
UTS ॲपच्या Terms & Conditions मान्य करा.
रजिस्टर बटण दाबा आणि तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
नॉर्मल तिकीट बुकिंग
क्विक तिकीट बुकिंग
प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग
सीजन तिकीट बुकिंग / रिन्यूअल
QR कोड तिकीट बुकिंग
UTS ॲपमधील 'बुक तिकिट' या पर्यायावर क्लिक करा.
'नॉर्मल बुकिंग'चा पर्याय निवडा.
पेपर किंवा पेपरलेस तिकिट यापैकी तुमची पसंती निवडा.
स्टेशनचे नाव किंवा कोड टाइप करा.
पॅसेंजर, मेल किंवा एक्सप्रेस यापैकी तिकिटाचा प्रकार निवडा.
'फेअर मिळवा' या पर्यायावर क्लिक करा. पेमेंट पेज उघडेल.
R-वॉलेट किंवा इतर ऑनलाइन पेमेंट पद्धती निवडा.
तिकिटाचे पैसे ऑनलाईन माध्यमातून भरा. तुम्हाला तिकिट बुक झाल्याचा मेसेज येईल.
UTS डॅशबोर्डवर 'तिकिट दाखवा' या पर्यायावर क्लिक करून तिकिट पाहू शकता.
'बुक तिकिट' पर्यायातून 'क्विक बुकिंग' निवडा.
पेपर किंवा पेपरलेस तिकिट निवडा.
'पुढील' या बटणावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल. तुमचे नेहमीचे मार्ग निवडा.
तिकिटाचे पेमेंट करा.
UTS ॲपमध्ये लॉग इन करा.
स्टेशनचे नाव किंवा कोड टाइप करा.
'प्लॅटफॉर्म बुकिंग' पर्याय निवडा.
पेपर किंवा पेपरलेस तिकिट निवडा.
किती जणांसाठी तिकिट हवे आहे ते निवडा.
पेमेंट पद्धत निवडा. R-वॉलेट किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI वापरू शकता.
पेमेंट झाल्यावर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकिट मिळेल. पेपरलेस निवडल्यास डिजिटल स्वरूपात तिकिट मिळेल.
UTS ॲपमध्ये 'सीझन बुकिंग' पर्यायावर जा. तिकिट पुढच्या दिवसापासून वैध असेल.
'बुक अँड ट्रॅव्हल' किंवा 'बुक अँड प्रिंट' पर्याय निवडा.
'इश्यू तिकिट' किंवा 'रिन्यू तिकिट' निवडा.
सुरुवातीचा आणि शेवटचा स्टेशन निवडा. बुकिंग प्रक्रिया पुढे चालवा.
या सोप्या पद्धतीने तुम्ही UTS ॲप वापरून वेगवेगळ्या प्रकारची तिकिटे सहजतेने बुक करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.