नऊ पर्याय वापरा Voter Card वरचा पत्ता बदला!

तुम्ही काही कारणांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहायला गेलात तर ही गरज जास्त असते
Voter card
Voter cardesakal
Updated on

तुम्ही नोकरी, लग्न किंवा इतर कोणत्या कारणांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहायला गेलात, तर व्होटर आयडीचं काय करायचं. असा प्रश्न तुमच्या मनात येतो. जिथे बदली झाली आहे त्या भागातील व्होटर आयडी (Voter ID) कसा तयार होईल? त्यासाठी किती वेळ लागेल? तसेच त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील?असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्यामुळे एकूण गोंधळ उडू शकतो. तुम्ही खालील पर्याय वापरून घरात बसून ऑनलाइनद्वारे व्होटर आयडी कार्डचा पत्ता बदलू शकता. (How To Change The Address On Voter Id)

आगामी काळात पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. जर तुम्हालाही त्यावेळी मतदान करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. जर तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार असाल तर तुम्ही व्होटर आयडी कार्ड लगेच तयार करून घेऊ शकता. (How To Change The Address On Voter Id)

Voter card
घरबसल्या करा आधार-मतदार कार्ड लिंक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुम्ही खालील पर्याय वापरून व्होटर कार्डवरचा पत्ता बदलू शकता (How To Change The Address On Voter Id)

१) तुम्ही पहिल्यांदा राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवरवर (National Voters Service Portal) लॉगिन किवा रजिस्टर करा.

२) त्यानंतर बाद ‘Correction of entries in electoral roll’ हा पर्याय निवडा.

३) नवीन पेज उघडल्यावर फॉर्म ८ तुम्हाला दिसेल. त्या फॉर्मवर क्लिक करा.

४) तिथे तुम्हाला आयडी कार्डवर करेक्शन चा पर्याय दिसेल. (How To Change The Address On Voter Id)

Voter card
First Time Voter : मतदान ओळखपत्र हवेय; पण ते कसं काढायचं?

५) तिथे सांगितलेली सर्व माहिती भरा आणि तुमचा बदललेला पत्ताही लिहा.

६) माहिती भरल्यावर तुम्हाला तुमचे माहितीपत्रक अपलोड करावे लागतील. त्यात निवासाच्या पुराव्यासाठी आधार आणि लायसंस जोडावे लागेल.

७) त्यानंतर तुम्हाला तुमची जी माहिती बदलायची असेल ती बदलू शकता. तुम्हाला पत्ता बदलायचा असेल तर त्यावर क्लीक करा. जर नाव बदलायचे असेल तर तिथे क्लिक करा.

८) ते भरल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि इमेल आयडी भरून द्या.

९) आता सबमिटच्या पर्यायावर क्लिक करा. काही वेळानंतर व्हेरिफिकेशन करून झाल्यावर तुम्हाला तुमचे व्होटर आयडी कार्ड पाठवले जाईल. (How To Change The Address On Voter Id)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.