BSNL Network Check : तुमच्या एरियामध्ये BSNL ला रेंज आहे की नाही? सिमकार्ड घेण्यापूर्वीच असं चेक करा नेटवर्क स्टेटस

BSNL 4G Network : बीएसएनएल सिम घेण्याआधीच ओपनसिग्नलवरुन तुमच्या भागात सिग्नल स्ट्रेंग्थ, स्पीड आणि लेटेन्सी तपासता येते.
Check BSNL 4G Signal and Speed Without a Simcard
Check BSNL 4G Signal and Speed Without a Simcardesakal
Updated on

BSNL Network : आजच्या काळात मोबाईल फोन हे जवळपास सर्वच लोकांसाठी आवश्यक बनले आहे. बँकिंग, ऑनलाइन पेमेंट्स, मनोरंजन, तिकीट बुकिंग, शिक्षण आणि ऑनलाइन शॉपिंग अशी अनेक महत्त्वाची कामे मोबाईल फोनद्वारे केली जातात. या कामांसाठी मजबूत आणि स्थिर नेटवर्क कनेक्शन असणे खूपच आवश्यक आहे. मात्र, नेटवर्क समस्या, जसे की कमजोर सिग्नल किंवा नेटवर्क वारंवार बंद पडणे यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात.

पण चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या घरात किंवा ज्या भागात राहतात तिथे बीएसएनएलची 4G सेवा आहे का तपासणे आता अगदी सोपे झाले आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला अन्य खाजगी नेटवर्क कंपन्या म्हणजेच जेव्हा एअरटेल आणि वोडाफोनने रिचार्जच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे ग्राहक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात होती.अशात बीएसएनएलकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांमुळे ग्राहक वर्ग बीएसएनएलकडे जास्त आकर्षित होत आहे.

बीएसएनएल सिम घेण्याआधीच तुमच्या भागात सिग्नल स्ट्रेंग्थ, स्पीड आणि लेटेन्सी तपासता येते.

Check BSNL 4G Signal and Speed Without a Simcard
BSNL Rechage Plan : BSNL धमाका ऑफर! फक्त 91 रुपयांच्या रिचार्जमध्ये 90 दिवसांची वैधता, कॉलिंग अन् डेटासह इतर भन्नाट सुविधा

ओपनसिग्नल अॅप

मोबाईल नेटवर्कची ताकद म्हणजेच सिग्नल स्ट्रेंग्थ तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवर काही खास अॅप्स वापरू शकता. ओपनसिग्नल हे असेच एक उत्तम अॅप आहे. हे अॅप वापरून तुम्ही तुमच्या भागात बीएसएनएल, जियो, एअरटेल किंवा वोडाफोन आयडिया या वेगवेगळ्या कंपन्यांच्या नेटवर्कची ताकद तपासू शकता.

ओपनसिग्नल अॅप डाउनलोड करून त्यात सेटअप केल्यावर तुम्ही नेटवर्कची स्पीड, नेटवर्क उपलब्ध आहे का ते पाहू शकता, तुमच्या भागात कोणत्या नेटवर्क सिम उपलब्ध आहेत ते शोधू शकता आणि मोबाईल सिग्नल कुठून येतोय हे सुद्धा या अॅपद्वारे समजू शकते. तुमच्या परिसरात कोणत्या कंपनीचा नेटवर्क चांगला आहे हे या अॅपच्या नकाशावर हिरवा बिंदू दर्शवतो.

Check BSNL 4G Signal and Speed Without a Simcard
Whatsapp Avatar Feature : व्हॉट्सॲपच्या अवतार फीचरला आलंय AI अपडेट; कसं वापराल? जाणून घ्या

जिओ, एअरटेल, वोडाफोन किंवा बीएसएनएल कोणते चांगले?

ओपनसिग्नलच्या 'ऑल ऑपरेटर' या पर्यायाद्वारे तुम्ही जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि VI या सर्व नेटवर्कची माहिती एकाच वेळी पाहू शकता. त्यामुळे नवीन सिम घेण्यापूर्वी तुमच्या भागात कोणत्या कंपनीचे नेटवर्क चांगले आहे ते या अॅपच्या मदतीने अगोदरच समजू शकता.

बीएसएनएलची 4G सेवा, स्पीड, लेटेन्सी कशी तपासायची?

  • तुमच्या स्मार्टफोनवर ओपनसिग्नल अॅप डाउनलोड करा आणि इनस्टॉल करा.

  • अॅप सेटअप करा.

  • बीएसएनएलची 4G सिग्नल स्ट्रेंग्थ तपासण्यासाठी, अॅपच्या होम स्क्रीनवर तळच्या मेनूमध्ये असलेल्या पिनच्या बाणावर टॅप करा.

  • वरच्या मेनूमध्ये बीएसएनएल निवडा आणि 'टाईप' कॉलममधून 4G निवडा.

  • नकाशावर चांगल्या सिग्नलसाठी हिरवे आणि कमकुवत सिग्नलसाठी लाल बिंदू दिसतील. तुमच्या ठिकाणी डाउनलोड स्पीड, अपलोड स्पीड आणि लेटेन्सी देखील दाखवेल.

आता बीएसएनएलची 4G सेवा तुमच्या भागात आहे का ते तपासणे अगदी सोपे आहे. मग वाट कशाची पाहाताय? लगेच तुमच्या भागात बीएसएनएल नेटवर्क कव्हरेज तपासा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.